Kim Jong Un 
ग्लोबल

North Korea: 'युद्धासाठी तयार रहा'; किम जोंग यांचे उत्तर कोरियाच्या लष्कराला आदेश

Kim Jong Un: गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने युक्रेनविरोधातील युद्धासाठी रशियात सैन्य पाठवले असल्याची कबुली दिली.

Pramod Yadav

सेऊल: उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांनी लष्कराला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. स्पेशल ऑपरेशनसाठी नुकत्याच पार पडलेल्या लष्कराच्या संयुक्त अभ्यासानंतर किम जोंग यांनी याबाबत आदेश दिलेत.

सर्वात महत्वाचे काम म्हणजेच युद्ध यासाठी सर्व आवश्यक तयारी करा, असे आदेश किम जोंग यांनी बुधवारी लष्काराला दिल्याचे वृत्त स्थानिक वृत्त संस्था योनहापच्या वतीने देण्यात आले आहे. लष्कराच्या वतीने नुकतेच स्पेशल ऑपरेशन आणि स्ट्राईकसाठी फायर सराव पार पडला, असेही या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

"आपल्या क्रांतिकारी सशस्त्र दलांमध्ये आता फक्त काही आघाड्यांचे प्रतिनिधित्व राहिलेले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात साम्राज्यवादविरोधी वर्ग आघाडीचा समावेश आहे आणि युद्धाची पूर्ण तयारी करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे," असे किम यांनी म्हटल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

युक्रेनविरुद्धच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर कोरियाने रशियामध्ये सैन्य तैनात करण्याचे समर्थन करण्यासाठी किमने साम्राज्यवादविरोधी आघाडीची संकल्पना मांडल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरियाचे सैनिक मॉस्कोमध्ये ड्रोन उडविण्याचे धडे घेत असल्याचे फोटो समोर आले आहेत.

गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने युक्रेनविरोधातील युद्धासाठी रशियात सैन्य पाठवले असल्याची कबुली दिली. किम यांनी गेल्या आठवड्यात प्योंगयांगमधील रशियन दूतावासाला भेट दिली. युद्धात उत्तर कोरियाचा सहभाग न्याय्य आहे, त्यांनी मॉस्कोसोबतच्या परस्पर संरक्षण करारांतर्गत सार्वभौम अधिकारांचा वापर केल्याचे किम यावेळी म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT