4G Tower In Goa: गोव्यात मोबाईल नेटवर्क होणार आणखी स्ट्राँग; IT विभाग 66 ठिकाणी उभारणार 4G टॉवर

4G Mobile Network In Goa: गेल्या दीड वर्षापासून गोव्यातील ६६ स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. बीएसएनएल, स्थानिक आमदार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने हे स्पॉट निश्चित केले आहेत.
IT department to install 66 new towers in Goa
Mobile TowerDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ६६ ठिकाणी 4G टॉवर उभारण्यात येणार आहेत. यातील १७ टॉवर बीएसएनएलच्या वतीने उभारण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नेटवर्क आणखी स्ट्राँग होणार आहे.

बीएसएनएलच्या वतीने १७ ठिकाणी टॉवर उभारण्यात आले आहेत. यात केपे तालुक्यातील ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क सुविधा सुधारणार आहे. केंद्राच्या 4G प्रकल्पाअंतर्गत हे टॉवर उभारण्यात येणार आहेत.

5G नेटवर्क सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील अनेक भागात मोबाईल टॉवर देखील नाहीत यामुळे नेटवर्क सुविधा विस्कळीत होतेय, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

IT department to install 66 new towers in Goa
Allahabad HC: सर्वांना समान वागणूक दिल्यास मुस्लिम व्यक्ती अनेक बायका ठेवू शकतो; कोर्ट

गेल्या दीड वर्षापासून गोव्यातील ६६ स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. बीएसएनएल, स्थानिक आमदार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने हे स्पॉट निश्चित केले आहेत. सरकारच्या वतीने शासकीय निश्चित करुन त्याठिकाणी टॉवर उभारण्यात येणारेय. वन भागात टॉवर उभारण्याचे काम अधिक आव्हानात्मक असते. राज्यातील २०० गावांमध्ये पंचायत इमारत आणि जमीन नाही, असे माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

IT department to install 66 new towers in Goa
Viriato Fernandes: गोव्यात कायमच राहण्यासाठी येऊ नका, काँग्रेस खासदाराने देशातील पर्यटकांना असे आवाहन का केले?

दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना ६६ ठिकाणी सरकारी जागा शोधून आवश्यक परवाने घेऊन काम पूर्ण करण्याची प्रक्रिया जलद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उरलेल्या जागेत देखील लवकरच टॉवर उभारण्याचे काम पूर्ण केले जाईल. केपे तालुक्यातील मोर्लपिर्ला सारख्या गावात एकही मोबाईल टॉवर नाही, अशी अनेक ठिकाणे असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com