POK Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

न अन्न, न औषध, न इंधन! POK मध्ये पाकड्यांची दादागिरी, काश्मीरी जनतेच्या मुळावर उठलं शाहबाज सरकार; लोकशाहीचा फाटला बुरखा

POK Crisis Food Fuel Medicine Shortage: पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे.

Manish Jadhav

POK Crisis Food Fuel Medicine Shortage: पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. या भागात आधीच अन्नधान्याची मोठी अडचण असताना आता लोकांना जीवनावश्यक औषधे मिळणेही कठीण झाले. स्थानिक पातळीवर सुरु असलेली निदर्शने दडपण्यासाठी आणि आंदोलकांवर दबाव आणण्यासाठी शाहबाज सरकार या भागात अन्न, इंधनाचा तुटवडा निर्माण करत असून औषध पुरवठा मुद्दाम रोखत असल्याचा आरोप होत आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे येथील मानवी संकट अधिकच गडद झाले आहे.

या संपूर्ण वादाची पाळेमुळे 'पीओके' विधानसभेच्या 12 जागांशी जोडलेली आहेत. या जागा भारतातून आलेल्या निर्वासितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इस्लामाबाद या जागांचा वापर स्थानिक निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि आपल्या आवडीचे सरकार स्थापन करण्यासाठी करत असल्याचा आरोप येथील स्थानिक संघटनांनी केला. या अन्यायाविरोधात जेव्हा 'जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी'ने तीव्र निषेध नोंदवला, तेव्हा पाकिस्तान सरकारने या संघटनेला थेट दहशतवादी (Terrorist) संघटना घोषित करुन टाकले.

या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक चकमकींमध्ये आतापर्यंत 58 लोकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून पाकव्याप्त काश्मीरमधील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. 'JAAC' ने पुकारलेल्या बंदमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, वस्तू आणि सेवांची वाहतूक रोखली गेल्याने स्थानिक बाजारपेठा व व्यवसाय बंद पडले आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक या भागात अन्न, इंधन आणि वैद्यकीय पुरवठा रोखून परिस्थिती आणखी खराब केल्याचा दावा स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांनी केला.

या आंदोलनांमुळे आणि संपामुळे अनेक शहरांमधील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून, प्रशासनाने मोबाईल इंटरनेट सेवाही मोठ्या प्रमाणावर खंडित केली. बहुतांश औषधांची दुकाने बंद असल्याने रुग्णांना औषधे मिळणे कठीण झाले. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने दुकानांमधील जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपला. इंधनाच्या तीव्र टंचाईमुळे पुंछ आणि मुझफ्फराबाद जिल्ह्यांतील पेट्रोल पंप पूर्णपणे बंद पडले असून, वाहनधारकांना ब्लॅक मार्केटमधून महागड्या दराने इंधन खरेदी करावे लागत आहे. विशेषतः पुंछ सेक्टर, रावलाकोट, बाग आणि दुर्गम नीलम व्हॅलीमध्ये रस्ते रोको आणि आंदोलनांमुळे पुरवठा मार्ग बंद असून, येथील जनता सध्या अन्न आणि औषधांविना अत्यंत कठीण परिस्थितीत जगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Market Leakage: पावसाळा आला की व्यापाऱ्यांची कसरत; डिचोली बाजार संकुलातील गळतीची समस्या अजूनही कायम!

Dhargal Flyover Project: उड्डाणपूल बांधकामाचा वाहकांना फटका; धारगळ मार्गावर वाहतूक विस्कळीत, उपाययोजनांची मागणी

Goa Detention Policy: पाचवी-आठवीत नापास धोरण लागू करा! केंद्राकडून गोव्याला तंबी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येबाबतही चिंता

Heatwave Alert: युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट! 26 देशात हाहाकार, फ्रान्समध्ये 58 मृत्यू; 14 हून अधिक देशात 'रेड अलर्ट'

Goa Politics: केवळ फातोर्डासाठी काँग्रेसशी युती नको, गोव्यात सत्तेसाठी विरोधकांची एकजूट गरजेची; विजय सरदेसाईंनी स्पष्ट केलं युतीचं गणित

SCROLL FOR NEXT