Pakistan School Tragedy Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Pakistan Peshawar School Tragedy: Children Killed as Roof Collapses: पाकिस्तानातून एक धक्कादायक घटना समोर आली. पेशावर येथील आफ्रिदी आबाद भागातील खाजगी शाळेचे अचानक छत कोसळून 28 जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Pakistan Peshawar School Roof Collapse: पाकिस्तानातून एक धक्कादायक घटना समोर आली. पेशावर येथील आफ्रिदी आबाद भागात खाजगी शाळेचे अचानक छत कोसळून 28 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मोठ्या संख्येने लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 21 विद्यार्थी आणि एका महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली. या अपघातात जीव गमावलेल्या मुलांचे वय 7 ते 12 वर्षांच्या दरम्यान होते, तर मृत मुलांमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे.

स्थानिक लेडी रीडिंग हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 30 हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून, आपल्या मुलांना गमावलेल्या पालकांच्या आक्रोशाने संपूर्ण वातावरण सुन्न झाले आहे.

या दुर्देवी घटनेवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शोक व्यक्त केला. पीडित कुटुंबांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त करत, या अपार दुःखातून सावरण्यासाठी कुटुंबीयांना शक्ती आणि धैर्य मिळो, अशी प्रार्थना केली.

दरम्यान, पाकिस्तानात (Pakistan) अशा प्रकारच्या इमारती आणि छतांचे कोसळण्याचे प्रकार नवीन नाहीत. निकृष्ट दर्जाची बांधकाम सामग्री, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि प्रशासकीय अनास्था ही यामागची मुख्य कारणे मानली जातात. यापूर्वीही या वर्षी जून महिन्यात लाहोरमधील एका ट्युशन सेंटरचे छत कोसळल्याने डझनहून अधिक विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच, कराचीच्या लियारी भागात एक 5 मजली इमारत कोसळून 27 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. अशा घटना वारंवार घडत असूनही शाळा आणि इमारतींच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT