Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

UNDP Pakistan Multidimensional Poverty Report: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने पाकड्यांची पुन्हा एकदा पोलखोल केली.
UNDP Pakistan Multidimensional Poverty Report
Pakistan Poverty ReportDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

UNDP Pakistan Multidimensional Poverty Report: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने पाकड्यांची पुन्हा एकदा पोलखोल केली. पाकिस्तानातील वाढत्या गरिबीबाबत एक अत्यंत धक्कादायक अहवाल जाहीर केला. या अहवालातून पाकिस्तानातील गरिबीचे भयानक वास्तव समोर आले. या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे तब्बल 38.3 टक्के लोक गरिबीचा सामना करत आहेत. याचा साधा अर्थ असा की, या लोकांना केवळ पैशांचीच कमतरता नाही, तर राहण्यासाठी चांगल्या सुविधा, उत्तम आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींपासूनही वंचित राहावे लागत आहे. पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने याबाबत सविस्तर वृत्त दिले.

दरम्यान, पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेशची तुलना केल्यास, बांगलादेशमध्ये बहुआयामी गरिबीचे प्रमाण 14.9 टक्के इतके आहे. म्हणजेच या दोन्ही देशांच्या गरिबीच्या आकडेवारीत खूप मोठा फरक असल्याचे दिसून येते. पाकिस्तानात गरिबीच्या खाईत लोटलेल्या लोकांच्या अडचणींचा स्तर 51.7 टक्के इतका गंभीर आहे. तसेच, पाकिस्तानची 12.9 टक्के लोकसंख्या अशी आहे जी अतिशय असुरक्षित स्थितीत जीवन जगत आहे. म्हणजेच ही लोकसंख्या कधीही गरिबीच्या तीव्र संकटात अडकू शकते.

UNDP Pakistan Multidimensional Poverty Report
Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

गरीबी ही केवळ कमी कमाईवरुन मोजली जात नाही, तर त्यात कुपोषण, मुलांचा मृत्यूदर, शिक्षणाचा अभाव, स्वच्छतेची वाईट व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी नसणे आणि विजेची कमतरता यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. विशेष म्हणजे, गेल्या 15 वर्षांत जगात पहिल्यांदाच बहुआयामी गरिबीने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या वाढून 1.2 अब्जावर पोहोचली.

UNDP Pakistan Multidimensional Poverty Report
Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांची अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; 3 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर

या गरिबीचा सर्वात मोठा फटका लहान मुलांना बसला असून, जगभरातील गरिबीचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक लहान मुले आहेत. यातील 83 टक्के गरीब लोक हे ग्रामीण भागात राहतात, जिथे मूलभूत सुविधा मिळणे अजूनही खूप मोठे आव्हान बनले आहे. दक्षिण आशियातील देशामध्येही गरिबीचे संकट खूप मोठे असून लाखो मुले अद्याप शाळेच्या बाहेर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com