India Pakistan Relations Dainik Gomantak
ग्लोबल

India Pakistan Relations: भारताच्या समर्थनार्थ पाकिस्तानी मीडिया, 'संबंध सुधारण्याची वेळ आली...'

Pakistan: भारताने दिलेल्या या निमंत्रणाबाबत पाकिस्तानमध्ये चर्चा सुरु असून लोक याकडे भारताच्या पाकिस्तानबाबत नरमाईची सुरुवात म्हणून पाहत आहेत.

Manish Jadhav

India Pakistan Relations: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना भारताने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. भारताने दिलेल्या या निमंत्रणाबाबत पाकिस्तानमध्ये चर्चा सुरु असून लोक याकडे भारताच्या पाकिस्तानबाबत नरमाईची सुरुवात म्हणून पाहत आहेत.

तथापि, भारत (India), यजमान या नात्याने, SCO शिखर परिषदेसाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांना आमंत्रित करणे ही केवळ औपचारिकता आणि बहुपक्षीय वचनबद्धतेचे प्रदर्शन आहे. पण पाकिस्तानी मीडियाने शाहबाज शरीफ सरकारला सल्ला दिला आहे की, भारतासोबतचे संबंध सुधारण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानी मीडिया म्हणतो- भारताशी संबंध सुधारा

भारत आणि पाकिस्तानने (Pakistan) आता अनेक दशके जुना वाद संपवून स्थिर आर्थिक संबंध पुनर्संचयित करावेत, असे भारतीय उपउच्चायुक्त सुरेश कुमार यांनी सुचविलेल्या विधानानंतर पाकिस्तानी माध्यमांमधील ही मागणी तीव्र झाली आहे.

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार सुरेश कुमार यांनी म्हटले आहे की, भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत. आपण ना आपला शेजारी बदलू शकतो ना देशाचा भूगोल बदलू शकतो. त्यामुळे दोन्ही देशांनी आपले संबंध सुधारणे चांगले.

भारतीय उपउच्चायुक्तांच्या चर्चेचे पाकिस्तानने कौतुक केले

डॉन या वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमध्ये लिहिले आहे की, पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्याला आपल्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत बोलले.

आता कोणत्याही प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांचे युग संपण्याची वेळ आली आहे. विशेषत: काश्मीरमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले, आता आर्थिक आणि व्यापारी संबंध सुधारण्याची वेळ आली आहे.

याआधी, संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला मित्र म्हटले होते, भलेही त्यांची जीभ घसरली असेल, पण आता भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT