China-Pakistan Relation: खरी मैत्री संकटाच्या वेळीच कळते असे म्हणतात. पण कंगाल पाकिस्तानचा मित्र मानणाऱ्या चीनने त्याचा विश्वासघात केला. चीनने पाकिस्तानी दूतावास बंद केले आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना चीनचा व्हिसा मिळू शकणार नाही.
दरम्यान, चीनने 'तांत्रिक कारणास्तव' पाकिस्तानमधील आपल्या दूतावासाचा कॉन्सुलर विभाग तात्पुरता बंद करत असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. चीनच्या या घोषणेमुळे पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणे कठीण होणार आहे.
पाकिस्तान आधीच भयंकर अशा आर्थिक संकटातून जात आहे. वीज आणि पेट्रोलचा तुटवडा कोणापासून लपलेला नाही. विशेष म्हणजे, पाकिस्तानात (Pakistan) महागाईने कळस गाठला आहे. ज्या लष्कराला पाकिस्तानात सर्वात शक्तिशाली म्हटले जाते, त्यांच्या सैनिकांचे रक्त सांडणाऱ्या टीटीपी म्हणजेच पाकिस्तानी तालिबानवर लष्करी कारवाई करण्यासाठी पुरेसा पैसा नाही.
दरम्यान, चीनने 'तांत्रिक कारणास्तव' पाकिस्तानमधील आपल्या दूतावासाचा कॉन्सुलर विभाग तात्पुरता बंद करत असल्याचे जाहीर केले आहे. चीनच्या या घोषणेमुळे पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणे कठीण होणार आहे.
पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, चीनच्या (China) दूतावासाने हे पाऊल उचलण्यामागे कोणतेही विशेष कारण दिलेले नाही. चीनी दूतावासाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटीसमध्ये कॉन्सुलर विभाग बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली.
13 फेब्रुवारीपासून सुरु झालेला हा बंद पुढील आदेशापर्यंत सुरु राहणार असल्याचे त्यात म्हटले आहे. दरम्यान, सुरक्षेची परिस्थिती पाहता पाकिस्तानमध्ये राहताना अत्यंत सावध राहावे, असा इशाराही चीनने आपल्या नागरिकांना दिला आहे.
चीन सरकारने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे, जेव्हा शाहबाज सरकारने एक दिवस आधी दावा केला होता की, ते देशातील नागरिक आणि परदेशी नागरिकांचे संरक्षण करेल.
पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी 12 फेब्रुवारी रोजी ग्वादरमधील अधिकाऱ्यांना पाकिस्तानी आणि परदेशी नागरिकांना संपूर्ण सुरक्षा देण्याचे निर्देश दिले होते. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांच्या या आश्वासनानंतरही चीनला विश्वास बसला नसून त्यांनी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.