India Pakistan: जम्मू-काश्मीरच्या 'या' भागात आयएसआयने केलीय घुसखोरीची तयारी

पाकिस्तान वारंवार भारत विरोधी कारवाया करत आहे
Terrorist
TerroristDainik Gomantak
Published on
Updated on

India Pakistan पाकिस्तान वारंवार भारत विरोधी कारवाया करत आहे. भारताला नामोहरम करण्यासाठी पाकिस्तानमध्ये सातत्याने भारताविरुद्ध कट रचले जात आहेत. सध्या तेथील थंडीच्या सीझनमुळे काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर बराच बर्फ जमा झालेला असल्याने पाकिस्तान दक्षिण पीर पंजाल म्हणजेच जम्मूमधून घुसखोरीच्या योजना आखत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या घुसखोरीच्या योजनेत पाकिस्तानी लष्कराचे अधिकारीही दहशतवाद्यांना मदत करत असल्याची माहिती समोर आलीय.

एका गुप्तचर अहवालानुसार, मकबूल भट्ट याची पुण्यतिथी 11 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान इस्लामाबादमध्ये साजरी करण्यात आली होती आणि यावेळी आयएसआय तेथे उपस्थित होता, तसेच यावेळी पाकिस्तानी लष्कराचे लष्करी गुप्तचर अधिकारी देखील यात सामील होते. यावेळी त्यांच्यात नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराच्या तैनातीची माहिती मिळवण्याबद्दल चर्चा झाली.

गुप्तचर अहवालानुसार, यापूर्वी या क्षेत्रातून घुसखोरीची जबाबदारी अयुब अल बद्रच्या हाती होती, ज्याला आता गेल्या वर्षी मानशेरा येथील अल बद्रच्या छावणीत पाठवण्यात आले आहे. आता कोटलीच्या अल बद्रच्या लाँचिंग कमांडरची जबाबदारी रियाझ मलिक नावाच्या दहशतवादी कमांडरकडे देण्यात आली आहे. तो पीओकेमधील भिंबर जिल्ह्यातील सामानी येथील रहिवासी आहे.

Terrorist
Azaan Controversy: भाजप नेते ईश्वरप्पा यांचे वादग्रस्त वक्तव्य, अजानवर केले 'हे' मोठे भाष्य

गुप्तचर अहवालात असेही समोर आले आहे की हिजबुल, जैश आणि आयएसआयने जानेवारीमध्येच जम्मू प्रदेशातून पीओकेच्या मीरपूर जिल्ह्यातील मंगला भागात घुसखोरीची ब्लू प्रिंट तयार करण्यासाठी एक बैठक घेतली होती.

घुसखोरी करण्यात यशस्वी न झालेल्या कमांडरची बदली करण्याचे आदेश देण्यात आले होते. या बैठकीत 12 ते 15 वेगवेगळ्या संघटनेचे दहशतवादी सहभागी झाले होते. यामध्ये कर्नल दर्जाचा आयएसआय अधिकारीही सहभागी असल्याची माहिती प्राप्त होतेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com