Shahid Afridi Targets Modi Govt: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आपल्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतो. यावेळीही त्याने भारतीय राजकारण आणि क्रिकेटवर भाष्य करताना वादग्रस्त वक्तव्य करुन राळ उडवून दिली. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदीने थेट मोदी सरकारवर 'हिंदू-मुस्लिम कार्ड' खेळण्याचा आरोप केला, तर त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.
आफ्रिदी म्हणाला की, "मी नेहमीच म्हणत आलो आहे की, हे सरकार सत्तेत येण्यासाठी हिंदू-मुस्लिम कार्ड खेळते. ही एक खूप वाईट मानसिकता आहे." भाजप सत्तेत असेपर्यंत अशा प्रकारचे राजकारण सुरुच राहील, असा दावाही त्याने केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करताना आफ्रिदीने राहुल गांधींच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले. तो म्हणाला की, "राहुल गांधींचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्यांना संवादाच्या माध्यमातून सर्वांसोबत, संपूर्ण जगासोबत पुढे जायचे आहे." तर भारत (India) सरकार 'पुढील इस्रायल' बनण्याचा प्रयत्न करत आहे, असा बेताल आरोपही पुढे बोलताना त्याने केला.
आफ्रिदीचे हे वक्तव्य त्याच्या नेहमीच्या भारतविरोधी भूमिकेशी मिळतेजुळते आहे. भारतावर एकतर्फी टीका करताना त्याने पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादाच्या इतिहासाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. भारताने नेहमीच 'दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भूमिका कायम ठेवली आहे.
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय खेळाडूंनी त्यांच्या पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवण्यास (Handshake) नकार दिला. या घटनेमुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला. त्याने याबाबत आयसीसीकडे औपचारिक तक्रार केली. हा निर्णय कोणताही वैयक्तिक द्वेष नसून एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील 26 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या घटनेच्या निषेधार्थ घेण्यात आला. त्याचवेळी, अनेक भारतीय चाहत्यांनीही पाकिस्तानसोबत सामना खेळण्यास विरोध केला होता. मात्र, बीसीसीआयने सरकारच्या धोरणानुसार सामना खेळण्याचा निर्णय घेतला.
त्यावर आफ्रिदीने प्रतिक्रिया देताना भारतीय खेळाडूंना हात मिळवण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप केला. "जेव्हा आशिया कप सुरु झाला, तेव्हा भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर बहिष्कार मोहिमा (Boycott Campaigns) सुरू होत्या. इतक्या मोठ्या जनदबावामुळे खेळाडूंना आणि बीसीसीआयला (BCCI) आमच्या संघासोबत हात मिळवू नका असे सांगण्यात आले, यात मला आश्चर्य वाटत नाही," असा दावा त्याने केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.