
आशिया कप २०२५ मध्ये क्रिकेटप्रेमींची सर्वाधिक उत्सुकता असलेला सामना सुरू होण्यासाठी काही तास उरले आहेत. १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्यात विजय मिळवून सुपर-४ मध्ये स्थान निश्चित करण्याच्या निर्धाराने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
भारतीय संघाने याआधी खेळलेल्या पहिल्या सामन्यात यूएईवर नऊ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत आत्मविश्वास वाढवला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा हा सामना हाय-व्होल्टेज ठरणार आहे.
भारतीय संघाच्या ओपनिंग जोडीमध्ये बदल होण्याची शक्यता नाही. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी यूएईविरुद्ध दमदार सुरुवात करून दिली होती. तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला उतरण्याची दाट शक्यता आहे.
मधल्या फळीत तिलक वर्मा निश्चित दिसतो आहे. त्याच वेळी, संजू सॅमसन विकेटकीपर म्हणून खेळत असून त्याचे स्थानही निश्चित मानले जात आहे.
भारतीय संघासाठी ऑलराउंडर विभाग हा नेहमीच ताकदीचा भाग राहिला आहे. हार्दिक पंड्या गोलंदाजीची सुरुवात करताना दिसू शकतो. अक्षर पटेल फिरकी आणि फलंदाजी दोन्ही बाजूंनी महत्त्वाचा आहे. शिवम दुबेने गेल्या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या होत्या. मात्र, अर्शदीप सिंगला संधी देण्यासाठी या तिघांपैकी कोणालातरी बाहेर बसावे लागू शकते.
गेल्या सामन्यात अर्शदीप सिंग प्लेइंग ११ मध्ये नव्हता, पण या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत ६३ सामन्यांमध्ये त्याने ९९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा अनुभव आणि फॉर्म पाकिस्तानविरुद्ध उपयोगी ठरू शकतो.
अर्शदीपला खेळवायचे झाल्यास, कुलदीप यादव किंवा वरुण चक्रवर्ती यापैकी एखाद्याला बाहेर ठेवावे लागेल. मात्र, या दोन्ही फिरकीपटूंनी यूएईविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली होती. कुलदीपने २.१ षटकात फक्त ७ धावा देऊन ४ बळी घेतले तर वरुण चक्रवर्तीने दोन षटकात ४ धावा देऊन १ बळी मिळवला होता.
दुबईच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मोठी मदत मिळत असल्याने, टीम इंडिया फक्त जसप्रीत बुमराहला एकमेव वेगवान गोलंदाज म्हणून उतरवू शकते. या परिस्थितीत भारत अतिरिक्त फिरकीवर भर देत पाकिस्तानला रोखण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाची प्लेइंग ११
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती / अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.