पाकिस्तान (Pakistan) आपल्या नापाक कृत्य करण्यापासून थांबत नाही आहे. त्याने पुन्हा जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मुद्द्यावरून भारताला डिवचले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्राच्या (United Nation) उच्च अधिकाऱ्यांना पत्र लिहून काश्मीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सोमवारी सांगितले की मंत्र्याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना याबाबत पत्र पाठवले आहे.(Pakistan write a letter to United Nation on Jammu-Kashmir issue)
सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस यांना नियमितपणे पत्र लिहिणारे कुरेशी यांनी त्यांच्या ताज्या पत्रात सुरक्षा परिषदेला जम्मू आणि काश्मीरबाबत घेतलेले निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यासाठी भारताने घटनेतील कलम 370 रद्द केल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. कलम ३७० रद्द करणे ही आपली अंतर्गत बाब असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला स्पष्टपणे सांगितले आहे. पाकिस्तानने वास्तव स्वीकारावे आणि सर्व भारतविरोधी प्रचार थांबवावा, असा सल्लाही भारताने पाकिस्तानला अनेक वेळा दिला आहे.
आपल्या पत्रात कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तान रचनात्मकपणे संवादासाठी तयार आहे, परंतु परिणाम-आधारित संवादासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारतावर आहे. तत्पूर्वी भारताने पाकिस्तानला सांगितले आहे की, दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसामुक्त वातावरणात भारताला इस्लामाबादसोबत सामान्य शेजारी संबंध हवे आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी आरोप केला होता की, भारत चीनशी असलेले त्यांचे संबंध खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. अल्वी म्हणाले, पाकिस्तानला नेहमीच आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे असतात. पण भारताने पाकिस्तनची ही इच्छा दुर्बलता म्हणून घेतली आहे. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी हे विधान विधानसभेच्या चौथ्या संसदीय वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने, द्विसदनीय संसदेचे कनिष्ठ सभागृहात केले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.