Fighter Jet Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानची बनवाबनवी! म्यानमारला विकली नादुरुस्त लढाऊ विमाने

Pakistan: या प्रकारामुळे पाकिस्तान आणि म्यानमार यांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तान आणि म्यानमार यांच्यामध्ये २०१६ साली जेट विमाने खरेदी करण्यासाठी करार झाला होता. या करारानुसार पाकिस्तानने म्यानमारला लढाऊ विमाने पाठवली होती. मात्र आता या लढाऊ विमानांमध्ये दोष असल्याचे जगासमोर आले आहे.

या प्रकाराबद्दल म्यानमारने पाकिस्तानला उत्तर मागितले असून कडक शब्दात संदेशही पाठवला आहे. २०१९ आणि २०२१ या दरम्यान, पाकिस्तानने या कराराची पूर्तता केल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र म्यानमारने दिलेल्या माहीतीनुसार, JF 17 Thunder या जेट विमानांच्या डिलवरीनंतर त्यामध्ये त्रुटी दिसून आल्या आहेत, त्यामुळे त्याचा वापर केला जाऊ शकत नाही. या प्रकारामुळे पाकिस्तान आणि म्यानमार यांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे.

म्यानमारच्या प्रशासनाने पाकिस्तानबरोबरच्या विमान खरेदी करण्याच्या नवीन चर्चांमध्ये सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

आता या विमानासाठी जे इतर देश पाकिस्तान( Pakistan )बरोबर करार करु इच्छित होते त्यांनी याकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने लॅटीन अमेरिकन देशांचा समावेश आहे. आता म्यानमार यावर काय भूमिका घेणार, पाकिस्तान काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NH 66 Closure: उन्नत मार्गासाठी पर्वरी ते घुरीये रस्ता 3 तासांसाठी बंद! सोमवारी घेणार 'ट्रायल रन'; पर्यायी मार्ग कोणते?

Rohit Sharma Angry: 'ऐ सोड त्याला...' फॅनसाठी मुंबईच्या राजाचा 'हिटमॅन' अवतार! सुरक्षा रक्षकावर भडकला Watch Video

Sanguem: माकडाच्या उड्येन, कशें कोसाळ्ळें सिलिंग? Watch Video

Hardik Pandya: महागड्या घड्याळांचा शौकीन, आलिशान घराचा मालक... हार्दिक पांड्याची Net Worth ऐकून चक्रावून जाल

Formula 4 Race Goa: ‘फॉर्म्युला-४ रेस’ चर्चेस दिला नकार! 9 नगरसेवक पडले बाहेर; मुरगाव पालिका मंडळाची बैठक तहकूब

SCROLL FOR NEXT