Hamza Shahbaz Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: शाहबाज शरीफ यांच्या मुलाला SC चा दणका, पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरुन हटवले

Pakistan News: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा मुलगा हमजा शाहबाज यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Supreme Court of Pakistan: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा मुलगा हमजा शाहबाज यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आले आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय सुनावला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर चौधरी परवेझ इलाही पंजाबचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानच्या जिओ इंग्लिश मीडियानुसार, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निकाल देताना देशाचे वझीर-ए-आझम शाहबाज शरीफ यांचे पुत्र हमजा शरीफ यांना मोठा दणका दिला आहे. हमजा शरीफ यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आले आहे. शरीफ यांना हटवल्याने चौधरी परवेझ इलाही यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निर्णय देताना उपसभापती मुहम्मद मजारी यांच्या निर्णयाला बगल दिली.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले

सर्वोच्च न्यायालयाने पंजाब प्रांताचे राज्यपाल बलिघुर रहमान यांना पीएमएल-क्यू पक्षाचे नेते चौधरी परवेझ इलाही यांना पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यास सांगितले. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, 'निवडणुकीत हमजा यांच्या बाजूने 179 मते पडली, तर इलाही यांच्या बाजूने 186 मते पडली. बहुमत इलाही यांच्या बाजूने आहे. त्यामुळे ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असतील.'

विशेष म्हणजे, उपसभापती मजारी यांच्या मदतीने हमजा शरीफ यांनी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. परंतु, इम्रान खान (Imran Khan) समर्थित पीएमएल-क्यूने ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) दार ठोठावले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT