Pakistan: या औषधाने शाहबाज सरकारची उडवली झोप; आत्महत्या वाढण्याचा धोका अधिक

Shehbaz Sharif: पाकिस्तानात इम्रान खान यांचे सरकार कोसळल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी सरकार स्थापन केले.
Shehbaz Sharif
Shehbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan News: पाकिस्तानात इम्रान खान यांचे सरकार कोसळल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी सरकार स्थापन केले. मात्र देशाच्या स्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. दैनंदिन वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यानंतर आता देशातील अनेक शहरांमध्ये औषधांचाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशात आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरी बाजारपेठ जे औषध मिळवण्यासाठी प्रयत्न करत ते लिथियम कार्बोनेट आहे, जे मानसिक विकार आणि संबंधित रोगांवर सर्वात प्रभावी औषध आहे.

Shehbaz Sharif
Pakistan News:पाकिस्तान मध्ये हिंदू मुलीच्या सक्तीच्या धर्मांतराला विरोध

पाकिस्तानी मीडिया द न्यूजनुसार, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि पाकिस्तान (Pakistan) सायकियाट्रिक सोसायटी (PPS) चे माजी अध्यक्ष, उपचारासाठी सर्वात प्रभावी औषध म्हणून काम करणाऱ्या फॉर्म्युलेशनचा संदर्भ देत म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून लिथियम कार्बोनेट विकणारे कोणीही ब्रँड बाजारात उपलब्ध नाही. हे औषध मानसिक विकार आणि त्याच्याशी संबंधित आजारांवर सर्वात प्रभावी औषध मानले जाते.''

एपिलेप्सीची औषधेही उपलब्ध नाहीत

त्याचप्रमाणे, लहान मुलांमधील अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) च्या उपचारासाठी मेथिलफेनिडेटसह काही इतर आवश्यक औषधे आणि मुले, प्रौढ नागरिकांसाठी क्लोनाझेपम ड्रॉप्स आणि एपिलेप्सी गोळ्या देखील बाजारात उपलब्ध नाहीत, असे अहवालात म्हटले आहे.

Shehbaz Sharif
Pakistan Flood: पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, शेकडो लोक बेघर

कोणत्या आजारांवर औषधांचा तुटवडा

द न्यूजकडे उपलब्ध औषधांची यादी आणि कराची, लाहोर (Lahore) आणि इस्लामाबादमधील (Islamabad) अनेक फार्मसीच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, टीबी, एपिलेप्सी, पार्किन्सन रोग, नैराश्य, हृदयविकार आणि इतर आजारावर उपचार करण्यासाठी अनेक महत्त्वाची औषधे उपलब्ध नाहीत. उत्पादन खर्च वाढल्याने औषध कंपन्या त्यांचे उत्पादन करत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com