Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांचे पुत्र हमजा शाहबाज हे मुख्यमंत्रीपद गमावणार

CM: चौधरी परवेझ इलाही नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता
Pakistan
Pakistan Dainik gomantak
Published on
Updated on

Imran khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने पंजाब विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना जोरदार झटका दिला आहे. पीटीआय आणि पीएम शाहबाज यांचा पक्ष 'पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज' यांच्यात ही लढत होती. यामध्ये पीटीआयने मोठा विजय मिळवला आहे.

हा निकाल पंतप्रधान शाहबाज यांचे पुत्र मुख्यमंत्री हमजा शाहबाज यांच्यासाठी धोक्याची घंटा आहेत. कारण ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रीपद गमावणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक होणार आहे. पीटीआय-पीएमएलक्यूचे पक्षाचे संयुक्त उमेदवार चौधरी परवेझ इलाही नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

Pakistan
Pakistan: पाकिस्तानमध्ये 50 जणांचा बुडून मृत्यू

शरीफ कुटुंबातील सत्ताधारी पीएमएल-एनने आपला पराभव स्वीकारला आहे. पोटनिवडणुकीत मोठ्या विजयाबद्दल पक्षाने पीटीआयचे अध्यक्ष खान यांचेही अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांचे प्रवक्ते मलिक अहमद खान म्हणाले की, आम्ही जनतेच्या जनादेशाचा आदर करतो. आता आम्ही पीटीआय-पीएमएलक्यूला पंजाबमध्ये सरकार स्थापन करणार आहे.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) 23 मे रोजी 25 असंतुष्ट PTI सदस्यांना अपात्र ठरवले, ज्यात महिला आणि अल्पसंख्याकांसाठी राखीव जागांवरून निवडून आलेल्या पाच सदस्यांचा समावेश आहे. खान यांच्या याचिकेवरून ही कारवाई करण्यात आली. नियमानुसार पक्ष किंवा आघाडीला त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी विधानसभेच्या 371 जागांपैकी किमान 186 जागा मिळणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com