PTI Workers Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan यांच्या समर्थकांचा गदारोळ; लाहोरमध्ये निदर्शने-रॅलींवर बंदी; 7 दिवस कलम 144 लागू

Pakistan: पाकिस्तानातील लाहोरमध्ये 7 दिवसांसाठी सर्व प्रकारची निदर्शने आणि उपोषणांवर बंदी घालण्यात आली आहे.

Manish Jadhav

Pakistan Crisis: पाकिस्तानातील लाहोरमध्ये 7 दिवसांसाठी सर्व प्रकारची निदर्शने आणि उपोषणांवर बंदी घालण्यात आली आहे. पंजाबच्या गृहविभागाने सुरक्षा परिस्थितीचे कारण देत ही कारवाई केली आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत सर्व प्रकारच्या सभा, रॅली, मिरवणूक आणि निदर्शने यावर बंदी असेल, असे म्हटले आहे.

दरम्यान, लाहोरमध्ये (Lahore) कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (उपद्रव किंवा आशंका धोक्याच्या तातडीच्या प्रकरणांमध्ये तात्पुरता आदेश) अंतर्गत ही बंदी लागू करण्यात आली आहे, जी तात्काळ लागू होईल.

खरे तर, पीटीआयने आज लाहोरमध्ये रॅली काढण्याची घोषणा केली होती. यासोबतच, महिला (Women) मोर्चाही काढणार असल्याची चर्चा होती. या संदर्भात, कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक पीटीआय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

डॉनच्या वृत्तानुसार, कलम 144 चे उल्लंघन केल्याबद्दल शेकडो पीटीआय कार्यकर्त्यांना मॉल रोडवर पोलीस कोठडीत घेण्यात आले. पीटीआय प्रमुख इम्रान खान यांचे निवासस्थान असलेल्या जमान पार्ककडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

पीटीआय समर्थकांविरुद्ध वॉटर कॅननचा वापर

एवढेच नाही तर, इम्रान यांच्या समर्थकांना पांगवण्यासाठी वॉटर कॅननचा वापर करण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाड्यांच्या काचाही फोडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे फुटेजही पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहे.

डॉनने पीटीआय नेते हम्माद अझहरच्या हवाल्याने सांगितले की, इम्रान बॉम्ब-प्रूफ आणि बुलेटप्रूफ वाहनात रॅलीत सहभागी होतील. हे पाऊल माजी पंतप्रधानांच्या जीवाला असलेला धोका अधोरेखित करते.

जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही रॅली इम्रान यांच्या लाहोरमधील जमान पार्क येथील निवासस्थानापासून सुरु होईल आणि दाता दरबार येथे संपेल. मात्र, पोलिसांनी पीटीआयचा हा डाव हाणून पाडल्याचा आरोप केला जात आहे.

पंजाबच्या आगामी प्रांतीय निवडणुकांवरुन गदारोळ

पंजाबमधील आगामी प्रांतीय निवडणुकांसाठी निवडणूक प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यासाठी पीटीआयने लाहोरमध्ये 'ऐतिहासिक' रॅलीची घोषणा केली होती. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी गेल्या आठवड्यात पंजाब प्रांतात 30 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याची घोषणा केली होती.

दुसरीकडे, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वाच्या प्रांतीय विधानसभांच्या निवडणुका 90 दिवसांच्या मुदतीत घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन दिवसांनी ही घोषणा करण्यात आली.

तसेच, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वाच्या प्रांतीय विधानसभा अनुक्रमे 14 जानेवारी आणि 18 जानेवारी रोजी विसर्जित करण्यात आल्या. पाकिस्तानी कायद्यानुसार, प्रांतीय असेंब्लीच्या विसर्जनाच्या 90 दिवसांच्या आत निवडणुका होणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

SCROLL FOR NEXT