Imran Khan: मी लष्कराची पंचिंग बॅग बनलो होतो; जनरल बाजवांचे कोर्ट मार्शल करा...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची मागणी
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए इन्साफ (पीटीआय)चे प्रमुख इम्रान खान यांनी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

रशियाविरोधी भाषणाबद्दल बाजवा यांचे कोर्ट मार्शल झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. पाकिस्तानी लष्कराला देशाचे राजकारण आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे भान नाही. सत्तेत असताना त्यांनी माझी अक्षरशः पंचिंग बॅग करून टाकली होती, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

Imran Khan
Cm Pramod Sawant: येत्या वर्षभरात गोव्यात सुसज्ज हज भवन उभारणार

लाहोरमध्ये बोलताना इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानी लष्कराला राजकारण आणि मुत्सद्देगिरीची समज नाही. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करत बाजवा यांनी पाकिस्तानच्या पाठीत खंजीर खुपसला. जनरल (निवृत्त) बाजवा हे गुंडगिरी करायचे, तर पंतप्रधान असताना त्यांना टीकेला सामोरे जावे लागले.

ते एक सुपर किंग होते. ते नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) नियंत्रित करत होते. त्यांच्याकडे पाकिस्तानी लष्कराची पूर्ण ताकद होती तर मी पंचिंग बॅग झालो होतो. बाजवा यांनी सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय घेतले, तर सर्व चुकीच्या गोष्टींसाठी आम्हाला दोषी ठरवले गेले.

शाहबाज शरीफ यांच्यावरील मनी लाँड्रिंगचा खटला बाजवा यांना नको असल्यामुळेच पुढे जाऊ शकला नाही. देशाच्या भल्यासाठी सध्याचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. तथापि, मुनीरदेखील मला शत्रू मानतात. जर कुणी बोलायला तयार नसेल तर मी काय करणार?

Imran Khan
Goa Temperature: गोव्यात मार्च महिना नोंदवणार तापमानाचा नवा विक्रम?

पंतप्रधानपदावरून हटवल्यापासूनच इम्रान हे जनरल बाजवा यांच्यावर नाराज आहेत. बाजवा यांनी अनेकवेळा आपल्या हत्येचा कट रचल्याचा तसेच देशाच्या सध्याच्या दुर्दशेला ते जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इस्लामाबाद सुरक्षा संवादात बोलताना जनरल बाजवा यांनी रशियाची निंदा केली होती. रशियाचे युक्रेनवरील आक्रमण तातडीने थांबवावे. एका छोट्या देशाविरूद्धच्या आक्रमकतेला माफ केले जाऊ शकत नाही, असेही बाजवा म्हणाले होते.

दरम्यान, स्वतःवरील आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, सरकारला माझ्यावरील आणि माझी पत्नी बुशरा बीबीवरील एकही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करता आलेला नाही. भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करून दाखवावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com