Imran Khan यांना जामीन मंजूर, लाहोर उच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा

Pakistan: दरम्यान, या प्रकरणावर सुनावणी करताना इम्रान खान यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Imran Khan: पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जामीनावर मोठी चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने इम्रान खान यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

त्याचवेळी, अन्य एका प्रकरणात न्यायालयाने अद्याप निकाल दिलेला नाही. निर्णय येईपर्यंत इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेची अटकळ बांधली जात होती.

Imran Khan
Imran Khan: 'जनरल बाजवा यांच्या कारस्थानामुळेच...', इम्रान खान यांचा घणाघात

दरम्यान, जामीन अर्जावरील सुनावणीसाठी इम्रान खान जेव्हा लाहोर उच्च न्यायालयात (High Court) पोहोचले, तेव्हा त्यांच्यासमवेत समर्थकांची मोठी गर्दी होती. बऱ्याच दिवसांनी ते न्यायालयाच्या आवारात पोहोचू शकले. गर्दीमुळे न्यायालयाला काही काळ सुनावणी थांबवावी लागली.

तसेच, गेल्या वर्षी खान (70) यांना निवडणूक आयोगाने प्रतिबंधित वित्तपुरवठा प्रकरणात अपात्र ठरवल्यानंतर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, खान या खटल्यातील जामीन अर्जावर सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले. न्यायमूर्ती तारिक सलील शेख या खटल्याची सुनावणी करत होते.

Imran Khan
Imran Khan: इम्रान खान पुन्हा वादात! महिलेबरोबर अश्लील संभाषणाची 'ऑडिओ क्लिप' व्हायरल

दुसरीकडे, सुनावणीपूर्वी उच्च न्यायालयाच्या मुख्य गेटवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. इस्लामाबादमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने गेल्या आठवड्यात या प्रकरणात अंतरिम जामीन वाढवण्यास नकार दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com