Pakistan Airlines Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: अजब 'पाकिस्तान'! पठ्ठ्याला विमानानं लाहोरहून जायचं होत कराचीला, पण पोहोचला सौदी अरेबियाला; वाचा नेमंक प्रकरण?

Pakistan Airlines: कराचीला विमानाने जाण्यासाठी निघालेला लाहोरचा शाहजैन चुकून सौदी अरेबियातील जेद्दाहला पोहोचला.

Manish Jadhav

पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कराचीला विमानाने जाण्यासाठी निघालेला लाहोरचा शाहजैन चुकून सौदी अरेबियातील जेद्दाहला पोहोचला. शाहजैनने एका खासगी विमान कंपनीवर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला. त्याने म्हटले की, तिकीट तपासल्यानंतरही एअर होस्टेसने त्याला चुकीच्या विमानात चढण्यापासून रोखले नाही.

शाहजैन म्हणाला की, डोमेस्टिक टर्मिनलच्या गेटवर दोन फ्लाईट्स उभ्या होत्या. काहीही न कळता तो जेद्दाहला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये चढला. सुमारे दोन तासांनंतरही जेव्हा विमान कराचीला पोहोचले नाही तेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली. तो म्हणाला की, त्यावेळी क्रू घाबरले आणि त्याला दोष देऊ लागले.

पासपोर्ट नाही, व्हिसा नाही, तरीही सौदीला पोहोचलो

शाहजैनने पुढे सांगितले की, त्याच्याकडे सौदी अरेबियाचा (Saudi Arabia) पासपोर्ट किंवा व्हिसा नव्हता. तरीही तो जेद्दाहला पोहोचला. एअरलाइनच्या या निष्काळजीपणामुळे त्याला परदेशात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तिथे एफआयए अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली आणि त्याला कराचीला आणण्याच्या प्रक्रियेला दोन ते तीन दिवस लागले.

कायदेशीर नोटीस पाठवली, भरपाईची मागणी केली

शाहजैनने आता या संपूर्ण प्रकरणाबाबत एअरलाइनला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याने म्हटले आहे की, 'एअरलाइनच्या चुकीमुळे त्याचे मोठे मानसिक आणि आर्थिक नुकसान झाले.' तो आता भरपाईची मागणी करत आहे, ज्यामध्ये अतिरिक्त प्रवास खर्च आणि गैरसोयीचा समावेश आहे.

विमानतळ प्राधिकरणाने विमान कंपनीला दोषी ठरवले

लाहोर विमानतळ व्यवस्थापन आणि पाकिस्तान (Pakistan) विमानतळ प्राधिकरणाने या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की विमान कंपनीने तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रियेत निष्काळजीपणा दाखवला होता. या घटनेमुळे सुरक्षा मानकांवरही गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

सुरक्षा त्रुटी की यंत्रणेतील बिघाड?

ही घटना केवळ एका व्यक्तीच्या अडचणीची कहाणी नाही तर पाकिस्तानमधील हवाई प्रवासाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करते. पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय परदेशात पोहोचणारा प्रवासी हा आंतरराष्ट्रीय नियमांचे थेट उल्लंघन आहे. आता विमान कंपनी या प्रकरणावर कशी प्रतिक्रिया देते आणि काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

Goa News: गोव्यात सरकारी कर्मचारी अजूनही Holiday च्या मूडमध्ये; जनतेची कामे ठप्प

Viral Video: 'पूर नव्हे, अल्लाहचा आशीर्वाद'! पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा पूरग्रस्तांना अजब सल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT