Pakistan Flood: पाकिस्तानमध्ये पावसाचे थैमान! पुरामुळे 72 जणांचा मृत्यू; महामार्गही बंद होण्याची शक्यता

Pakistan Flood Death: वायव्य खैबर पख्तुनख्वा, पूर्व पंजाब, दक्षिण सिंध आणि नैऋत्य बलुचिस्तान प्रांत या भागांत जून २६ पासून पावसामुळे ७२ जणांचा मृत्यू झाला आहे.
Pakistan Flood Death
Pakistan Flood DeathDainik Gomantak
Published on
Updated on

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे किमान ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही माहिती सोमवारी दिली.

वायव्य खैबर पख्तुनख्वा, पूर्व पंजाब, दक्षिण सिंध आणि नैऋत्य बलुचिस्तान प्रांत या भागांत जून २६ पासून पावसामुळे ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे अजून अजून पाऊस पडणार असून पूर येण्याची शक्यता आहे. महामार्गही बंद होऊ शकतात. यामुळे स्थानिकांनी घरातच थांबावे आणि पर्यटकांनी या भागांना भेट देऊ नये, असा इशारा दिला आहे.

गेल्या महिन्यांत वायव्येकडील स्वात नदीत एकाच कुटुंबातील १७ पर्यटक वाहून गेले होते. त्यातील चार जणांना वाचविण्यात आले आणि इतर १३ जणांचे मृतदेह नंतर सापडले. तेव्हापासून आपत्कालीन सेवा कमालीची दक्ष आहे.

Pakistan Flood Death
Talpan River Flood: पाईप वाहून गेले, सुपाऱ्या - ऊसाचे नुकसान; तळपण नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका

गिलगिट-बाल्टिस्तान आणि दक्षिण सिंधमध्ये स्थानिक प्रशासनाला आपत्कालीन यंत्रणा त्वरित सक्रिय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यटक व नागरिकांना डोंगराळ भाग, नद्यांचे किनारे टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Pakistan Flood Death
Pakistan: 'पाकिस्तानात सत्तेच्या चाव्या आसिफ मुनीरकडेच...' संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दुसऱ्यांदा कबुली

पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांत बहुतांश मृत्यू घरांची भिंत किंवा छत कोसळल्याने झाले असून, विशेषतः ग्रामीण भागातील चिखलाच्या वीटांचे घर यासाठी कारणीभूत ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com