
Pakistan Army Chief Asim Munir: भारताच्या बेधडक कारवाईनंतरही पाकड्यांची मस्ती काही जिरलेली दिसत नाहीये. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरवरुन गरळ ओकली. मुनीर यांनी काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना 'शहीद' म्हणून संबोधले. इतकेच नाहीतर मुनीर यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांना "वैध संघर्ष" म्हटले. पाकिस्तान यापुढेही दहशतवाद्यांना राजकीय, नैतिक आणि राजनैतिक पाठिंबा देणार असल्याचे देखील ते पुढे म्हणाले.
दरम्यान, मुनीर यांनी त्यांच्या भाषणात जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना वैध संघर्ष ठरवत दुहेरी अर्थाची भाषा वापरली. त्यांनी प्रॉक्सी बंडखोरीला राजकीय, नैतिक आणि राजनैतिक पाठिंबा देण्याचे सुरु ठेवणार असल्याचे देखील आश्वासन दिले. याशिवाय, त्यांचे वक्तव्य हे आणखी एक संकेत देते की, पाकिस्तान (Pakistan) आंतरराष्ट्रीय वैधतेच्या नावाखाली भारताला अस्थिर करण्याची भूमिका बजावत राहील.
असिम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्द्यावर भारताविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य करुन राळ उडवून दिली. आपल्या भाषणादरम्यान मुनीर म्हणाले की, "आम्ही काश्मिरी लोकांच्या हक्कांसाठी आणि दशकांपूर्वीच्या वादाच्या निराकरणासाठी त्यांच्या पाठीशी उभे आहोत. भारत ज्याला दहशतवाद म्हणतो तो प्रत्यक्षात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांच्या आकांक्षांशी सुसंगत एक "कायदेशीर संघर्ष" आहे."
पुढे मुनीर म्हणाले की, 'जोपर्यंत काश्मीर मुद्द्यावर न्याय्य आणि शांततापूर्ण तोडगा निघत नाही तोपर्यंत दक्षिण आशियात कायमस्वरुपी शांतता शक्य नाही.' मुनीर यांनी काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शहीद श्रद्धांजली वाहिली.
दहशतवादाचा पुरस्कर्ता असलेला पाकिस्तान नेहमीच जगाला दिशाभूल करत आला आहे. जनरल मुनीर यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून देशांतर्गत दहशतवादी हल्ले वाढले आहेत. राजकीय अस्थिरता आणि जनतेच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, पाकिस्तान पुन्हा एकदा 'काश्मीर कार्ड' खेळून देशांतर्गत समस्यांवरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे.
पाकिस्तान अनेकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) ठरावांचा हवाला देतो, परंतु वास्तव असे आहे की, 1948 च्या ठरावात पाकिस्तानवर पहिली अट होती की त्याने पीओकेमधून दहशतवाद्यांना काढून टाकावे. परंतु ही अट आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. या कारणास्तव, काश्मीर मुद्दा आता संयुक्त राष्ट्रांमध्ये निष्क्रिय मानला जातो.
आंतरराष्ट्रीय समुदाय देखील काश्मीरला भारताचा अंतर्गत मुद्दा मानतो. दुसरीकडे मात्र पाकिस्तान काश्मीरसह संपूर्ण भारतात (India) दहशतवाद पसरवण्याचे काम करत आला. पाकिस्तानने दहशतवादाला आपल्या धोरणात्मक धोरणाचा भाग मानले. भारताने पाकिस्तानचे आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत. भारत आजपर्यंत म्हणतो की, जम्मू आणि काश्मीर हा त्याचा अविभाज्य आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान आगपाखड करत आहे. भारत सरकारचे म्हणणे आहे की, पाकिस्तान बऱ्याच काळापासून काश्मीरमध्ये दहशतवाद आणि सांप्रदायिक अतिरेकीपणाला प्रोत्साहन देत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.