Maldives Pakistan Relations  Dainik Gomantak
ग्लोबल

स्वत:चा देश सांभाळता येईना आणि चालले Maldives च्या मदतीला! पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा मोइज्जूंना फोन

Maldives Pakistan Relations: आता असा प्रश्न पडतो की, पाकिस्तान स्वतःचा देश सांभाळू शकत नाही देशावरील कर्ज वाढले आहे, महागाई गगनाला भिडली आहे आणि ते मालदीवला मदत करायला निघाले आहेत.

Ashutosh Masgaunde

Pakistan, has come forward to help Maldives, Interim PM Anwarul Haq Qakar has spoken to President Mohammad Moijjoo over the phone:

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू जेव्हापासून सत्तेत आले आहेत, तेव्हापासून ते भारतविरोधी पावले उचलत आहेत. चीन समर्थक अध्यक्ष मोइज्जू यांनी मालदीवमध्ये तैनात भारतीय लष्कराला भारतात परत पाठवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी एक शिष्टमंडळ भारतात येऊन चर्चा करत आहे.

दुसरीकडे भारताचा विरोध करणाऱ्या मालदीवच्या मदतीसाठी सध्या असंख्य संकटांनी घेरलेला पाकिस्तान पुढे आला आहे. पाकिस्तानचे अंतरिम पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांच्याशी फोनवर बोलून विकासासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे.

आता असा प्रश्न पडतो की, पाकिस्तान स्वतःचा देश सांभाळू शकला नाही आणि मालदीवला मदत करायला चालला आहे.

भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकल्यानंतर मालदीवच्या पर्यटन उद्योगावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत गरीब पाकिस्तान, ज्याची स्वतःची अर्थव्यवस्था खालावली आहे आणि महागाई गगनाला भिडली आहे, तो मालदीवला मदत करण्याविषयी बोलत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतासोबतच्या तणावादरम्यान शेजारी देश पाकिस्तान मालदीवच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. पाकिस्तानने मालदीवला विकासकामात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात, पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. आणि विकासासाठी मदतीचे आश्वासन दिले. प्रादेशिक सहकार्याव्यतिरिक्त, दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याला चालना देण्याच्या मार्गांवरही चर्चा केली.

मालदीव आणि पाकिस्तान यांच्यात 26 जुलै 1966 रोजी राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. दोन्ही देशांमधील आणखी एक मजबूत दुवा म्हणजे चीन. एकप्रकारे पाकिस्तान हा चीनचा सदाबहार मित्र मानला जातो तर मालदीवचे अध्यक्ष मुइझू हे देखील चीनचे समर्थक आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली आणि तेथील सौंदर्याची तुलना मालदीवशी केली. यावर मालदीवमधील मोइज्जू सरकारचे मंत्री संतप्त झाले आणि तीन मंत्र्यांनी पीएम मोदींच्या दौऱ्याच्या छायाचित्रांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. मात्र या मंत्र्यांना निलंबित करण्यात आले.

मात्र त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. त्याच वेळी मोहम्मद मोइज्जू यांनी भारताला मागे टाकून आपला मित्र चीनचा पहिला अधिकृत दौरा केला.

या भेटीमुळे मोइज्जू यांनी ती परंपरा मोडली ज्यामध्ये मालदीवचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेला कोणताही नेता पहिल्यांदा भारताला भेट देतो. अशा स्थितीत मोइज्जू यांच्या 'वाईट'पणामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बागा बीचवर 'मिल्की ब्युटी'चा धमाका! तमन्नाच्या पॉवरपॅक परफॉर्मन्सनं लावलं वेड; गोव्याच्या समुद्रकिनारी रंगली न्यू इयर पार्टी

'पाश्चात्य देशांनी लसींचा साठा केला, पण भारतानं जग वाचवलं!', कोविड लसीकरणावरुन जयशंकर यांची IIT मद्रासमध्ये तूफान फटकेबाजी VIDEO

New Kia Seltos Launch: क्रेटाचं टेन्शन वाढलं! किआ सेल्टोस नव्या अवतारात लाँच; पाहा किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Usman Khawaja Retirement: "मी पाकिस्तानी- मुस्लिम म्हणूनच मला..."; निवृत्तीच्या वेळी ख्वाजाचे गंभीर आरोप Watch Video

Masorde: सफर गोव्याची! रानवनांनी - नद्यांनी वेढलेले, औषधी पाण्याचा प्रवाह असणारे 'मासोर्डे'

SCROLL FOR NEXT