Goa News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 50 हजारांची उपस्थिती अपेक्षित

Goa News: दामू नाईक : सभेच्या ठिकाणी तयारीची अधिकाऱ्यांकडून पाहणी
PM Narendra Modi Goa Visit
PM Narendra Modi Goa VisitDainik Gomantak

Goa News: फेब्रुवारीच्या 6 तारखेला मडगावच्या कदंब बसस्थानकाच्या जागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘विकसित भारत प्रदर्शना’चे उद्‌घाटन व त्याचबरोबर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

PM Narendra Modi Goa Visit
Margao Police: ‘त्‍या’ मुलांच्‍या पालकांच्या शोधासाठी पोलिस कर्नाटकात

या सभेस 50 हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे व त्यासाठी सर्व तयारीला सुरवात झाल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी सोमवारी (ता.२९) सांगितले.

मडगावचे आमदार दिगंबर कामत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार नरेंद्र सावईकर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, कदंब महामंडळ, सार्वजनिक बांधकाम तसेच पोलिस अधिकारी तयारीची पाहणी करण्यास उपस्थित होते.

आज जी पाहणी झाली त्यात पार्किंग व्यवस्था, प्रदर्शनातील स्टॉल, अतिमहनीय व्यक्तींसाठी तसेच लोकांसाठी प्रवेशद्वार याबद्दलचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे, असे दामू नाईक यांनी सांगितले.

सावईकर यांनी सांगितले की, हीच जागा निश्र्चित करण्यात आली असून तयारीची पाहणी करण्यासाठी आम्ही जमलो आहोत. ही सभा व प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com