Maldives President Mohamed Muizzu: चीनधार्जिण्या मोइज्जूंना विरोधक दाखवणार 'इंगा'; लवकरच सुरु करणार सत्तेतून हाकलण्याची प्रक्रिया!

Maldives President Mohamed Muizzu: मालदीवचे चीनधार्जिणे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू हे आतापर्यंत भारताला कडाडून विरोध करत होते, मात्र आता त्यांची हुकूमशाही वृत्ती देशातही समोर येत आहे.
Maldives President Muhammad Muizzu
Maldives President Muhammad MuizzuDainik Gomantak
Published on
Updated on

Maldives President Mohamed Muizzu: भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. मालदीवचे चीनधार्जिणे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू हे आतापर्यंत भारताला कडाडून विरोध करत होते, मात्र आता त्यांची हुकूमशाही वृत्ती देशातही समोर येत आहे. त्यांनी विरोधी पक्षांना संसदेत येण्यापासून रोखले. त्याचवेळी, चार मंत्रिमंडळ सदस्यांबाबत विरोधकांची मान्यता न मिळाल्याने मालदीवच्या संसदेत प्रचंड गदारोळ झाला आणि खासदारांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान मुइज्जू यांच्या खासदारांनाही मारहाण झाली. यातच आता विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, मोइज्जू यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. विशेष म्हणजे, ते लवकरच त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करणार आहेत.

दरम्यान, मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) च्या संसदेत सर्वाधिक जागा आहेत. पक्षाचे म्हणणे आहे की, 'मोइज्जू यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यासाठी पुरेशा खासदारांची सहमती आहे.' एका एमडीपी खासदाराने सनऑनलाइन मीडिया वेबसाइटशी बोलताना सांगितले की, 'इतर सहकाऱ्यांसह मोइज्जू यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी केली जात आहे.' मात्र, विरोधी पक्षांनी अद्याप प्रस्ताव दिलेला नाही.

Maldives President Muhammad Muizzu
Maldives Parliament: मालदीवची संसद बनली 'सर्कस', राष्ट्रपती मुइज्जू यांच्या खासदारांचा गदारोळ; व्हिडिओ व्हायरल!

दुसरीकडे, एक दिवस आधी मालदीवच्या संसदेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचा हाणामारीचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. वास्तविक, मंत्रिमंडळ सदस्यांच्या मंजुरीबाबत चीन समर्थक मुइज्जू आणि विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. एमडीपीने चार सदस्यांना मान्यता दिली नाही. यानंतर मुइज्जू यांच्या पक्षाच्या खासदारांनी संसदेत विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर खासदार अब्दुल्ला शाहीम, अब्दुल हकीम शाहीम आणि अहमद इसा एकमेकांना भिडले. यामध्ये शाहीम यांना दुखापत झाली. विशेष म्हणजे, हाणामारीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदार सभापतींच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते.

एमडीपी आणि डेमोक्रॅट्सने आधीच ठरवले होते की, ते मुइज्जू मंत्रिमंडळासाठी चार सदस्यांना मान्यता देणार नाहीत. मालदीवमध्ये सध्या मुइज्जू यांचे आघाडी सरकार आहे. अशा परिस्थितीत त्यांना पुरेशा खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षाने सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडला. एका विशिष्ट पक्षाला पाठिंबा देऊन आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचा आरोप सभापतींवर करण्यात आला.

Maldives President Muhammad Muizzu
India Maldives: "भारत आमचा जुना मित्र," मालदीवच्या अध्यक्षांना त्यांच्याच देशात विरोधकांनी घेरले

भारताच्या विरोधामुळे मालदीवचे विरोधकही चिंतेत आहेत

भारताच्या विरोधामुळे मालदीवचे विरोधक चिंतेत आहेत. मुइज्जू यांच्या पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीलाही माजी राष्ट्राध्यक्षांनी विरोध केला होता. मुइज्जू आणि भारत आमनेसामने आल्यापासून मालदीवमधील विरोधक सत्तेसाठी अधिक आक्रमक दिसत आहेत. गेल्या वर्षी 17 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष बनताच चीन समर्थक मुइज्जू यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांनी भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले होते. त्यामुळेच मालदीवच्या जनतेने त्यांना जनादेश दिला असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com