pakistan defence minister khawaja asif  ''अफगाणिस्तानात घुसून धडक कारवाई करु...''; पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांची धमकी!
ग्लोबल

Pakistan: ''अफगाणिस्तानात घुसून धडक कारवाई करु...''; पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांची धमकी!

Pakistan Defence Minister Khawaja Asif: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहेत.

Manish Jadhav

पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहेत. याचदरम्यान, पाकिस्तानी मंत्र्यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या मंत्र्याने थेट अफगाणिस्तानात घुसून कारवाई करण्याची धमकी दिली.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकी दिली की, 'लष्कराने नुकत्याच सुरु केलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून अफगाणिस्तानस्थित बंदी असलेल्या तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते.' यासोबतच त्यांनी बंदी घातलेल्या संघटनेशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास नकार दिला.

ऑपरेशन आझम-ए-इश्तेहकम सुरु झाले

सरकारने गेल्या आठवड्यात ‘ऑपरेशन आझम-ए-इश्तेहकम’ सुरु करण्याची घोषणा केली होती. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून (टीटीपी) पाकिस्तानला निर्माण झालेल्या वाढत्या धोक्याचा सामना करणे हा त्याचा उद्देश आहे. अफगाण तालिबानने (Taliban) टीटीपीच्या दहशतवाद्यांना त्यांच्या भूमीचा वापर करण्यासाठी दिलेल्या कथित गुप्त संमतीमुळे पाकिस्तानसाठी धोका वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात नाही

द एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आसिफ यांनी व्हॉईस ऑफ अमेरिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दहशतवादविरोधी मोहीम सुरु करण्याचा निर्णय घाईने घेतलेला नाही. शेजारील देशात टीटीपीच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते आणि हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात नाही. अफगाणिस्तान पाकिस्तानच्या (Pakistan) विरोधात दहशतवाद्यांना आपली भूमीचा आसरा देतोय. आसिफ पुढे म्हणाले की, टीटीपी शेजारील देशातून कारवाया करत आहे.

आसिफ यांनी इम्रान खानवर साधला निशाणा

वृत्तानुसार, देशात तालिबानी दहशतवाद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आसिफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मागील सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले की, खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकारने चर्चेनंतर सुमारे चार ते पाच हजार तालिबानी दहशतवाद्यांना परत आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT