Pakistan: ‘’होय, अल्पसंख्याकांचा छळ होतो, जगभर पाकिस्तानची बदनामी होतेय...’’; पाकिस्तानची कबुली

Minorities Persecution In Pakistan: पाकिस्तानमध्ये हिंदू, अहमदिया किंवा ख्रिश्चन समुदायातील लोकांना ईशनिंदेच्या नावाखाली मॉबकडून लिंच केले जाते.
PM Shehbaz Sharif
PM Shehbaz SharifDainik Gomantak

पाकिस्तानमध्ये हिंदू, अहमदिया आणि ख्रिश्चन धर्मातील लोकांना ईशनिंदेच्या नावाखाली मॉबकडून लिंच केले जाते. अशा लिंचिंगच्या बातम्या दररोज येतात. यातच आता, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही तिथे अल्पसंख्याक सुरक्षित नसल्याची कबुली दिली आहे. नॅशनल असेंब्लीत बोलताना ख्वाजा आसिफ यांनी धर्माच्या नावाखाली अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याची कबुली दिली. ही चिंतेची बाब आहे. ख्वाजा आसिफ म्हणाले की, ‘अल्पसंख्याकांची दररोज हत्या होते. त्यांना इस्लामच्या छायेखाली सुरक्षित वाटत नाही. मला त्यांच्या समस्या दूर करायच्या आहेत, पण विरोधक अडथळे आणतायेत. अल्पसंख्यांकावर होत असलेल्या हल्ल्यांमुळे जगभर पाकिस्तानची बदनामी होत आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘संविधानाने संरक्षण दिले असूनही इस्लामशी संबंधित लहान पंथांव्यतिरिक्त इतर धर्माचे लोकही देशात सुरक्षित नाहीत. राष्ट्रीय सभेने अल्पसंख्याकांच्या संरक्षणाबाबत ठराव पास करावा.’ ते पुढे असेही म्हणाले की, ‘असे अनेक लोक अत्याचाराला बळी पडले आहेत ज्यांचा ईशनिंदेशी संबंध नव्हता, परंतु वैयक्तिक शत्रुत्वामुळे त्यांची हत्या करण्यात आली. छोट्या मुस्लिम समुदायांनाही अपमानाचा सामना करावा लागतो. मात्र आम्ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी कठिबद्ध आहोत.’

PM Shehbaz Sharif
Pakistan Violence: कुराणाच्या अपमानावरुन जमावाने पोलीस ठाण्याला लावली आग; संशयिताला जिवंत जाळले

पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार, शीख, हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांना जबरदस्तीने धर्मांतर, अपहरण, हत्या आणि धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत. ही समस्या कोणत्याही एका राज्यातील नसून देशाच्या विविध भागांमधून अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. ते पुढे म्हणाले की ‘अहमदिया समाजाला सर्वाधिक टार्गेट केले जाते. त्यांना द्वेषयुक्त भाषणापासून ते हिंसक हल्ल्यांपर्यंत अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. याशिवाय, ख्रिश्चन धर्मातील लोकांनाही नोकरी, शिक्षणाच्या नावाखाली छळवणुकीला सामोरे जावे लागते.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com