Pakistan Caretaker PM Anwar Ul Haq Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan PM: 'भारतानं काश्मीरला जगातील सर्वात मोठं जेल बनवलं...' 'पाक' च्या काळजीवाहू पंतप्रधानांनी ओकली गरळ

India-Pakistan on Kashmir: पाकिस्तानातील सत्तेची कमान सध्या काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांच्या हातात आहे.

Manish Jadhav

India-Pakistan on Kashmir: पाकिस्तानातील सत्तेची कमान सध्या काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांच्या हातात आहे. देशातील निवडणुका घेण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.

मात्र, व्हॉईस ऑफ अमेरिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानमध्ये लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडणुका घेण्याबाबत भाष्य केले. सीमेवर तणाव असला तरी त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडणार नाहीत, असे ते म्हणाले.

पण या सगळ्यात पाकिस्तानचे (Pakistan) काळजीवाहू पंतप्रधान भारताविरुद्ध विष ओकायला विसरले नाहीत. ते म्हणाले की, पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा जगाच्या प्रत्येक व्यासपीठावर मांडत राहील. संयुक्त राष्ट्र महासभेला उपस्थित राहण्यापूर्वी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

काकर यांच्या मते, 'संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यावरील हा सर्वात जुना आणि न सुटलेला मुद्दा आहे. पाकिस्तान सर्व क्षेत्रीय मंचांवर आणि सर्व अंगांनी या समस्येचे समर्थन करेल आणि तो निकाली निघेपर्यंत आवाज उठवत राहील.'

काळजीवाहू पंतप्रधान खोटं बोलले

पाकिस्तान हे जगातील दहशतवाद्यांचे (Terrorists) आश्रयस्थान आहे, हे वास्तव कोणापासून लपलेले नाही. काश्मीरला अस्थिर करण्यासाठी तो सातत्याने दहशतवाद्यांचा हत्यार म्हणून वापर करतो. यावेळी, काश्मीरमध्ये 4G नेटवर्क असतानाही पाकिस्तानचे अंतरिम पंतप्रधान खोटे बोलणे टाळत नाहीत.

काकर पुढे म्हणाले की, भारताने काश्मीरला जगातील सर्वात मोठे जेल बनवले आहे. काश्मीरी जनतेचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. आखाती देशांसोबत भारताचे संबंध दृढ होत असताना काकर यांचे हे वक्तव्य आले आहे. त्यावरही काकर म्हणाले की, भारतासोबतच्या मजबूत संबंधांमुळे पाकिस्तान एकाकी पडत नाही.

90 दिवसांत निवडणुका होणार नाहीत

पाकिस्तानमध्ये 90 दिवसांत निवडणुका होणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. खरेतर, पाकिस्तानमधील असेम्ब्ली विसर्जित होण्याच्या काही दिवस आधी, कॉमन इंटरेस्ट कॉन्सिल (CCI) ने पॉपुलेशन अॅण्ड हाउसिंग सेन्ससला ग्रीन सिग्नल दिला होता.

इम्रान खान यांच्याबाबत काकर म्हणाले की, त्यांना राजकारणातून बाहेर काढण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. त्यांची सर्व प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT