Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Political Crisis: इम्रान खान यांच्या अटकेवरुन उडाला भडका, रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयात जमावाची जाळपोळ!

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातील परिस्थिती चिघळली आहे.

Manish Jadhav

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातील परिस्थिती चिघळली आहे.

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी समर्थकांना रस्त्यावर येण्याचे आवाहन केले, त्यानंतर पीटीआय समर्थक ठिकठिकाणी गोंधळ, तोडफोड आणि जाळपोळ करत आहेत.

दरम्यान, रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयात जमाव घुसला तेव्हा हद्द झाली. एवढेच नाही तर लष्कराच्या कॉर्प्स कमांडरच्या निवासस्थानाचीही जमावाने तोडफोड केली.

इस्लामाबादमधील (Islamabad) परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे, कार्यकर्त्यांनी मुख्य रस्ता रोखून धरल्याने परिस्थीती अधिकच बिकट झाली आहे.

दुसरीकडे, इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्संनी अटक केल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमध्ये निदर्शने करत गोंधळ घातला.

यानंतर इस्लामाबाद पोलिसांनी शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला. भ्रष्टाचाराच्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी इम्रान खान इस्लामाबाद उच्च न्यायालयात उपस्थित असताना रेंजर्संनी त्यांना अटक केली.

हिंसाचाराच्या भीतीने इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात (Pakistan) हिंसाचार सुरु झाला आहे. इम्रान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड, जाळपोळ सुरु केली.

हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले. इस्लामाबादशिवाय पाकिस्तानच्या अनेक भागात निदर्शने सुरु झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT