Imran Khan Arrest in Pakistan: पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेच्या वृत्ताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
इम्रान यांच्या अटकेने पाकिस्तानमध्ये मोठे राजकीय वादळ उठले आहे. इम्रान यांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरु लागले आहेत.
तर दुसरीकडे, इस्लामाबाद उच्च न्यायालयानेही इम्रान यांच्या अटकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यात आली. त्यांना रेंजर्सच्या मदतीने एनएबी म्हणजेच नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने ताब्यात घेतले.
जिओ न्यूजनुसार, पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान बायोमेट्रिक्ससाठी न्यायालयात जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी, NAB अधिकाऱ्यांकडे अटक वॉरंटही होते.
खान यांचे वॉरंट एनएबीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल (निवृत्त) नजीर अहमद बट यांनी 1 मे रोजी जारी केले होते. खान यांना राष्ट्रीय उत्तरदायित्व अध्यादेश 1999 च्या कलम 9A अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी खान यांच्या अटकेवर नाराजी व्यक्त करत आयजींना 15 मिनिटांत उत्तर देण्यास सांगितले.
आयजी इस्लामाबाद यांनी एका निवेदनात सांगितले की, पीटीआयचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले की, इस्लामाबादमधील (Islamabad) परिस्थिती सामान्य आहे, शहरात कलम 144 लागू आहे, उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. इम्रान यांना अटक करण्यात आलेले अल-कादिर ट्रस्ट प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया...
तसेच, इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि त्यांचे जवळचे सहकारी झुल्फिकार बुखारी आणि बाबर अवान यांचा अल-कादिर विद्यापीठ प्रकल्प ट्रस्टमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.
इम्रान खान (Imran Khan), पत्नी बुशरा बीबी, बुखारी आणि अवान यांनी झेलमच्या सोहावा तहसीलमध्ये 'दर्जेदार शिक्षण' देण्यासाठी 'अल-कादिर विद्यापीठ' स्थापन करण्यासाठी ट्रस्टची स्थापना केल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, ट्रस्टच्या कार्यालयाचा पत्ता ‘बनी गाला हाऊस, इस्लामाबाद’ असा आहे. विशेष म्हणजे, कागदपत्रांमध्ये असे नमूद केले आहे की, स्थावर मालमत्ता व्यवसायात गुंतलेल्या खाजगी कंपनीकडून देणग्या मिळवण्यासाठी विश्वस्तांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
कंपनीने ट्रस्टला 458 कनाल, 4 मरला, 58 चौरस फूट जमीन दिली. कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करुन, बुशरा बीबी यांनी मार्च 2019 मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.