Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

177 खासदारांचा पाठिंबा असल्याचा विरोधकांचा दावा, इम्रान खानचे सरकार जाणे निश्चित?

दैनिक गोमन्तक

इस्लामाबाद: पाकिस्तानमधील इम्रान खान (Imran Khan) सरकारसाठी आजचा दिवस निर्णायक ठरू शकतो. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आज नॅशनल असेंब्लीत मतदान होणार आहे. 2018 मध्ये पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसणे इम्रान खान यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते. त्यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या अनेक खासदारांव्यतिरिक्त त्यांच्याच पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्या विरोधात मतदान करण्याचे संकेत दिले आहेत. क्रिकेट जीवनात अनेक गुगलीचा सामना करणारा इम्रान यावेळी राजकीय खेळपट्टीवर आपली फलंदाजी वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. (NO-Confidence Motion Against Imran Khan)

क्रिकेटमध्ये निष्णात असलेल्या इम्रानने राजीनामा देण्यास नकार देत शेवटच्या चेंडूपर्यंत उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानचे राजकारण आज कोणते वळण घेते, हे पाहावे लागेल. पंतप्रधान इम्रान खान यांना सरकारमध्ये राहण्यासाठी 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये 172 मतांची आवश्यकता आहे. 175 खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा विरोधकांनी आधीच केला आहे. सरकारमधील इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चा प्रमुख सहयोगी असलेल्या मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट-पाकिस्तान (एमक्यूएम-पी) ने त्याच्यापासून स्वतःला दूर केले आहे.

जवळपास 24 खासदारांनी यापूर्वीच इम्रानविरोधात मतदान करण्याचे संकेत दिले आहेत. इम्रानच्याच पक्ष पीटीआयच्या अनेक खासदारांनीही बंडखोर वृत्ती दाखवली आहे. अशाप्रकारे अविश्वास ठरावावर मतदान होण्यापूर्वीच इम्रान खान यांनी बहुमत गमावले आहे.

मला सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधकांनी विदेशी शक्तींसोबत षडयंत्र रचल्याचे इम्रान खान म्हणाले. इम्रान खान यांनी एक मेमो प्रसारित केला आहे, ज्यामध्ये त्यांनी ठामपणे सांगितले आहे की वॉशिंग्टनने पाकिस्तानच्या विरोधी पक्षांसोबत षडयंत्र रचले आहे आणि त्यांना सत्तेवरून दूर केले आहे. कारण अमेरिकेला 'वैयक्तिकरित्या, मला सत्तेतून काढून टाकले पाहिजे... आणि सर्व काही माफ केले जाईल' असे वाटते, असे मत त्यांनी या मेमो मधून व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT