Sri Lanka Crisis: भारत आपले सैन्य श्रीलंकेत पाठवणार नाही: उच्चायुक्त

भारत संकटग्रस्त श्रीलंकेत आपले सैन्य पाठवणार नाही; उच्चायुक्तालयाकडून 'त्या' वृत्ताचे खंडन
Sri Lanka Crisis
Sri Lanka Crisisdainik gomantak

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील परिस्थिती सध्या भयावह झाली आहे. येथे दूध, औषधे, पाणी, फळे, भाजीपाला यासह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. दैनंदिन वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इतकेच काय तर औषध, दूध आणि पाण्याचा प्रश्न ही भयंकर झाला आहे. येथे लोकांना साधा चहा ही घेण्यासाठी 80 रुपये मोजावे लागत आहेत. तर सगळ्यात महत्वाची बाब असणाऱ्या पाण्यासाठी तर लोक एकमेकांशी भांडत आहेत.

2019 पासून सुरू झालेले आर्थिक संकट आता इतक्या टोकाला पोहोचले आहे की संपूर्ण देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे श्रीलंकेतील लोक त्रस्त आहेत. मूलभूत गोष्टींच्या पूर्ततेसाठीही लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकांच्या सहनशिलतेचा बांध तुटला असून ते रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शनिवारपासून कर्फ्यू लावण्यात आला असून तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीलंका सरकारला लोकांच्या रोशाला तोंड द्यावे लागत आहे. अशातच भारत संकटग्रस्त श्रीलंकेत आपले सैन्य पाठवणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्या बातम्यांचे खंडण करताना, भारत आपले सैन्य श्रीलंकेत पाठवणार नसल्याचे श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले आहे. (India has denied reports that preparing to send its troops to Sri Lanka)

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत भारत आपले सैन्य पाठवणार नाही. अशी माहिती श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी (Indian High Commissioner) ही दिली आहे. उच्चायुक्तांनी, भारत श्रीलंकेत सैन्य पाठवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच त्यांनी याबाबत ट्विट केले की, 'श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी भारत सैन्य पाठवण्याचा विचार करत असल्याच्या काही बातम्या आल्या होत्या. त्या खोट्या आणि निराधार बातम्यांचा उच्चायोग ठामपणे इन्कार करतो. उच्च आयोग अशा बेजबाबदार वृत्ताचा निषेध करतो आणि आशा करतो की संबंधीत लोक अशा अफवा पसरवणे थांबवतील.'

Sri Lanka Crisis
रशिया-युक्रेन चर्चा पुन्हा एकदा 'निष्फळ'

भारताची श्रीलंकेला मदत

मात्र, आर्थिक संकटात (Economic Crisis) सापडलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने हात पुढे केले असून ४० हजार मेट्रिक टन डिझेलची खेप पाठवली आहे. कोलंबोमधील भारतीय (Indian) दूतावासाने ट्विट केले की, 'भारताकडून श्रीलंकेला अधिक इंधनाचा पुरवठा करण्यात आला आहे. तर ऊर्जा मंत्री गामिनी लोकुगे यांच्याकडे उच्चायुक्तालयाच्या वतीने भारताकडून 500 मिलियन डॉलर क्रेडिट लाइनद्वारे करण्यात आले आहेत.

तसेच अधीक माहिती देताना, LoC च्या अंतर्गत ही चौथी खेप आहे. गेल्या 50 दिवसांत भारतातून दोन लाख टन इंधन (Fuel) पाठवण्यात आले आहे. श्रीलंकेत शनिवारपासून कर्फ्यू सुरू झाला असून तो सोमवारपर्यंत सुरू राहणार असल्याचे वृत्त आहे. यापूर्वीही नागरिकांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षेयांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com