North Korea Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea: उत्तर कोरिया युद्धासाठी तयार, अमेरिका आणि दक्षिण कोरियाला आव्हान

North Korea: अमेरिकेच्या मिसाईललादेखील नष्ट करण्याची ताकद या मिसाइलमध्ये असल्याची नोंद जपानने केली आहे.

दैनिक गोमन्तक

North Korea: उत्तर कोरिया नेहमीच आपल्या कठोर भूमिकांमुळे चर्चेत असते. आता वॉश्गिंटन आणि सियोलला चेतावणी देण्यासाठी उत्तर कोरियाने एका आंतरमहाद्विपकल्पीय बॅलेस्टिक मिसाइलचे परिक्षण केले आहे.

हे मिसाइल परमाणू बॉंबला नष्ट करु शकते. मिळालेल्या माहितीनुसार, किम जोंग उन यांनी अचानक लॉंचिंगचा आदेश दिला होता. उत्तर कोरियाने ह्वासोंग -15 या मिसाइलचे 2017 मध्ये पहिल्यांदा प्योंगयांग हवाई तळावरुन परिक्षण केले होते.

दक्षिण कोरियाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास एका आयसीबीएम लॉंच झाल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या सेनेला मिळाली होती. जपाननेदेखील याला दुजोरा दिला असून जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात मिसाइल 66 मिनिटांपर्यत उडत होते. महत्वाची बाब म्हणजे, अमेरिकेच्या मिसाईललादेखील नष्ट करण्याची ताकद या मिसाइलमध्ये असल्याची नोंद जपानने केली आहे.

दरम्यान, उत्तर कोरियाच्या या परिक्षणानंतर वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. ईवा विश्वविद्यालाच्या प्रोफेसर पार्क वोन-गॉनकेलेल्या वक्तव्यानुसार,उत्तर कोरिया जेव्हा मिसाइलचे परिक्षण करते तेव्हा ते इतर राष्ट्रांना युद्धासाठी आव्हान देत असते.

आता मिसाइलचे परिक्षण करुन उत्तर कोरिया हे अमेरिका( USA ) आणि दक्षिण कोरियाला ( South Korea ) आम्ही युद्धासाठी तयार आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT