Brazil: बाळाच्या कंबरेवर अचानक वाढला नवा अवयव, डॉक्टरही चक्रावले

ब्राझीलमध्ये जन्मलेल्या एका बाळाला चक्क सहा सेंटीमीटर लांब शेपटी फुटल्याची घटना समोर आली आहे.
Brazil
BrazilDainik Gomantak

Brazil: ब्राझीलमध्ये जन्मलेल्या एका बाळाला चक्क सहा सेंटीमीटर लांब शेपटी फुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे डॉक्टर देखील चक्रावले आहेत. जर्नल ऑफ पेडियाट्रिक सर्जरी केस (Journal of Pediatric Surgery Case) रिपोर्ट्समध्ये या वैद्यकीय चमत्कराची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

(Baby Girl With 6-Centimetre Tail Born In Brazil)

या संबधित समोर आलेल्या अभ्यासानुसार, स्पायना बिफिडा (Spina Bifid) असे या आजाराला म्हटले जाते. वाढ होणाऱ्या बाळाच्या पाठीच्या कण्यामुळे अशी विसंगती उद्भवत असते. बाळाच्या मणक्यामध्ये अंतर निर्माण झाले होते, ज्यातून शेपटीची वाढ व्हायला लागली. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

बाळाची आईला मादक पदार्थ घेण्याचा किंवा आजारपण असल्याची कोणताही माहिती समोर आलेली नाही. मुलाची प्रसूती देखील सिझेरियनद्वारे झाली होती. डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली असता त्याचा पाठीचा कणा आणि मणके जिथे एकत्र येतात तिथे एक मऊ टिश्यू शेपटी तयार झाल्याचे आढळले.

Brazil
Agartala: भारतात घुसण्याचा प्रयत्न, 10 रोहिंग्यांसह 16 जणांना अटक
Brazil
BrazilDainik Gomantak

बाळाचा एमआरआय करण्यात आला. तर, त्याच्या शारीरिक तपासणीत 6 सेमी त्वचेने झाकलेली मऊ मांसल शेपटी वाढत असल्याचे आढळले.

दरम्यान, वैद्यकीय शस्त्रक्रियेद्वारे ही शेपटी किंवा वाढलेला मांसल भाग काढून टाकण्यात आला. हे बाळ आता तीन वर्षांचे आहे आणि शस्त्रक्रियेचे त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. असे असले तरी बाळाची वरचेवर वैद्यकीय तपासणी सुरू आहे. बाळाच्या मूत्रमार्गाचा संसर्ग (urinary tract infection) देखील नियंत्रणात असून, त्याच्यावर प्रतिजैविकांनी यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर बाळ आता व्यवस्थितपणे चालू शकत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com