Nigeria Demonetisation Dainik Gomantak
ग्लोबल

Nigeria : एटीएमसमोर रांगा, बँकेतील रोखड संपली...'या' देशात 'नोटाबंदी'मुळे लोकांचे बुरे हाल

नोटाबंदीच्या निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

चार वर्षापूर्वी भारतात 'नोटाबंदी' करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियामध्ये नोटाबंदी करण्यात आली आहे. नायजेरिया हा देश गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. बँकांमधील तणाव, पोलिसांची सुरू असलेली गस्त आणि एटीएमसमोरील लांबलचक रांगा यामुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे.

नोटाबंदीच्या निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशातील बँकिंग क्षेत्रात गोंधळाचे वातावरण आहे. दरम्यान, लोक हातात रोख रक्कम मिळविण्यासाठी हतबल झाले आहेत.

नायजेरिया सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशातील ताज्या 'नोटाबंदी'मुळे परिस्थिती बिकट झाली आहे. नायजेरिया सरकारने लोकांना जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत जाण्यास सांगितले, परंतु नवीन नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

जुने पैसे नव्याने बदलून घेण्यासाठी लोक रात्ररात्र जागून बँकांमध्ये रांगा लावत आहेत, पण नवीन नोटा फार कमी बँका उपलब्ध आहेत. त्यामुळे काही ठिकाणी हिंसाचाराच्या बातम्याही समोर आल्या आहेत. रोख रकमेची तीव्र टंचाई आहे. नायजेरियामध्ये ऑनलाइन व्यवहार अजून लांब आहेत.

लोक रात्रभर जागून जुने पैसे नव्याने बदलण्यासाठी बँकांमध्ये रांगा लावत आहेत. अनेकांनी त्यांच्याकडे रोख रक्कम पूर्णपणे संपली आहे आणि ते त्यांच्या कुटुंबाचे पोट भरण्यास असमर्थ आहेत, असे म्हणत आहेत. रोखीची तीव्र टंचाई असल्याने तेथील लोक गाड्यांमध्ये तेल देखील भरू शकत नाहीत.

ग्रामीण भागात बँकांचा मोठा तुटवडा आहे, नायजेरियात मोठ्या प्रमाणावर गरिबी आहे. घाबरलेल्या नायजेरियन लोकांना भिती वाटते की त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोटा निरुपयोगी होतील आणि त्यांची बचत वाया जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT