Nigeria Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Nigeria Crisis: नायजेरियात किडनॅपिंगचा खेळ सुरुच; 300 मुलांनंतर आता हल्लेखोरांनी सुमारे 100 गावकऱ्यांचे केले अपहरण

Nigeria Crisis: आफ्रिकेतील गरीब देश असलेल्या नायजेरियाला सध्या सर्व बाजूंनी संकटांचा सामना करावा लागत आहे. देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे.

Manish Jadhav

Nigeria Crisis:

आफ्रिकेतील गरीब देश असलेल्या नायजेरियाला सध्या सर्व बाजूंनी संकटांचा सामना करावा लागत आहे. देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे. बोको-हराम आणि आयएससारखे अनेक सशस्त्र दहशतवादी गट दररोज हल्ले करत आहेत. देशातील आर्थिक संकटही शिगेला पोहोचले आहे. नायजेरियन सरकार आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यात असहाय्य दिसते. नुकतेच उत्तर नायजेरियात सामूहिक अपहरणाचे प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका सशस्त्र हल्लेखोरांच्या गटाने सुमारे 100 गावकऱ्यांचे घरातून अपहरण केले आहे.

सुमारे 100 गावकऱ्यांचे अपहरण

वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यात सशस्त्र टोळ्यांनी दोन गावांवर हल्ले केले असून सुमारे 100 लोकांचे अपहरण केले आहे. काजुरुचे प्रतिनिधी उस्मान दल्लामी यांनी स्टिंगो वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, बंदुकधाऱ्यांनी शनिवारी आणि रविवारी कडुना राज्यातील काजुरु कॉन्सिल भागात 'डोगोन नोमा' समुदायावर हल्ला केला आणि समुदायातील 14 महिलांसह (Women) 87 लोकांना ताब्यात घेतले.

यापूर्वी 300 विद्यार्थ्यांचे अपहरण झाले होते

दरम्यान, कडुना राज्य हे तेच क्षेत्र आहे, जिथे यापूर्वी सुमारे 300 शाळकरी मुलांचे अपहरण झाले होते. नायजेरियातील सामूहिक हत्या आणि अपहरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सशस्त्र टोळ्यांवरही या सामूहिक अपहरणाचा आरोप आहे. उस्मान दल्लामी यांनी स्टिंगो वृत्तसंस्थेला सांगितले की, येथे कुठेही सुरक्षा दलांची उपस्थिती नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहरण होऊनही एकही सुरक्षा कर्मचारी येथे आलेला नाही. स्टिंगोने नायजेरियातील (Nigeria) दुर्गम भागात सुरक्षाव्यवस्था नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

सरकारची भूमिका काय आहे?

गेल्या वर्षी अपहरण झालेल्या मुलांच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी करण्यात आली होती, ज्याला नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी नकार दिला होता. ताज्या अपहरणावर टिनुबूच्या सरकारने अद्याप कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. या मुलांचा अद्याप सुगावा लागलेला नाही. आत्तापर्यंत टिनबू सरकार देशाला आर्थिक आणि लष्करी संकटातून बाहेर काढण्यात अयशस्वी ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT