Nigeria: नायजेरियातील शाळेवर बंदूकधाऱ्यांचा हल्ला; 5 मिनिटांत 300 मुलांचे अपहरण

नायजेरियातील कुरिगा येथील एका शाळेवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी शाळेतील सुमारे 300 विद्यार्थ्यांचे अपहरण केले.
Kuriga Nigeria and kidnapped about 300 students
Kuriga Nigeria and kidnapped about 300 studentsDainik Gomantak
Published on
Updated on

Nigeria: नायजेरियातील कुरिगा येथील एका शाळेवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी शाळेतील सुमारे 300 विद्यार्थ्यांचे अपहरण केले. मुलांचे अपहरण करण्यासाठी हल्लेखोराला पाच मिनिटे लागली. हल्लेखोरांनी मुलांना कुठे नेले किंवा ते लपले आहेत का, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. अपहरण झालेल्या मुलांबाबत माहिती न मिळाल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.

वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक अतिरेकी आणि सशस्त्र टोळ्यांचा गड असलेल्या उत्तर-पश्चिम नायजेरियामध्ये ही घटना घडली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे आतापर्यंत मुलांच्या अपहरणाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या मुलांपैकी 100 मुलांचे वय 12 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Kuriga Nigeria and kidnapped about 300 students
Nigeria: लहान मुले आणि महिलांसह नायजेरियात 200 लोकांचे अपहरण

गेल्या आठवडाभरात अपहरणाची ही तिसरी घटना

अहवालानुसार, गेल्या आठवड्यापासून नायजेरियातील कुरिगा येथे सामूहिक अपहरणाची ही तिसरी घटना आहे. या तिन्ही घटनांची जबाबदारी अद्यापपर्यंत कोणत्याही गटाने घेतलेली नाही. याआधी एका सशस्त्र टोळीने उत्तर पश्चिम राज्यातील सोकोटो येथील एका शाळेतून 15 मुलांचे अपहरण केले होते. यानंतर, ईशान्येकडील बोर्नो राज्यातील 200 लोकांचे अपहरण करण्यात आले, त्यापैकी बहुतेक महिला आणि मुले होती.

2014 मध्ये 200 हून अधिक मुलांचे अपहरण झाले होते

सुमारे दशकभरापूर्वीही नायजेरियामध्ये अपहरणाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. 2014 मध्ये, इस्लामिक अतिरेक्यांनी चिबोक, बोर्नो येथून 200 हून अधिक शाळकरी मुलींचे अपहरण करुन संपूर्ण जगाला धक्का दिला. आता एका दशकानंतर विविध शाळांमधून सुमारे 1400 विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. 100 चिबोक मुलींसह अनेक लोक अजूनही ओलीस आहेत.

Kuriga Nigeria and kidnapped about 300 students
Nigeria Army: नायजेरियामध्ये लष्कराने घेतला आपल्याच नागरिकांचा जीव, अशी चूक ज्यामुळे 120 जणांना गमवावे लागले प्राण

डझनभर बंदूकधाऱ्यांनी शाळेवर हल्ला केला

शाळेतील शिक्षिका नूरा अहमद यांनी एपीला सांगितले की, मुले गुरुवारी त्यांच्या वर्गात शिकत होती, तेव्हा डझनभर बंदूकधारी शाळेत घुसले आणि त्यांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे भीतीपोटी जवळपास 300 मुलांचे अपहरण करण्यात आले. हल्लेखोर शाळेत शिरताच त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता, जेणेकरुन बाहेरुन कोणीही आत येऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com