Beer Dainik Gomantak
ग्लोबल

सिंगापूरमध्ये सांडपाण्यापासून बनवली जातेय बिअर, जाणून घ्या आश्चर्यकारक कारण

ज्या पाण्यातून मानवाचे मूत्र आणि विष्ठा वाहते त्या सांडपाण्यापासून न्यूब्रू नावाची बिअर तयार केली जात आहे

दैनिक गोमन्तक

बिअर हे जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक पेय आहे. ते तयार करण्यासाठी भरपूर पाणी लागते. मात्र सध्या सिंगापुरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या समस्या डोकं वर काढत आहे. त्यामुळेच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या सिंगापूरमधील एका ब्रुअरीने न्यूब्रू नावाची बिअर बाजारात आणली आहे. जी त्याने सांडपाण्यापासून बनवली आहे. ज्या पाण्यातून मानवाचे मूत्र आणि विष्ठा वाहते त्या पाण्यापासून ही बिअर तयार करण्यात आली आहे.

Newbrew लाँच करण्याचा हाच उद्देश आहे

Newbrew सुमारे 95 टक्के गोड्या पाण्यापासून बनवली जाते, बिअर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पूर्णपणे फिल्टर केले जाते. मात्र इथे हे सांडपाणी किती प्रमाणात फिल्टर केले जाते हे तर देवच जाणे. अलिकडच्या वर्षांत देशातील पाण्याच्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे हा या कंपनीचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंगापूरला सध्या पाणीटंचाईच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि अशा परिस्थितीत देशात हा प्रकार घडत आहे.

न्यूब्रू सिंगापूरची 'ग्रीनेस्ट बिअर'

द स्ट्रेट टाईम्सच्या मते, सिंगापूर इंटरनॅशनल वॉटर वीक (SIWW) मधील वॉटर कॉन्फरन्सच्या संयोगाने राष्ट्रीय जल एजन्सी PUB आणि स्थानिक क्राफ्ट बिअर ब्रुअरी 'Brewworks' द्वारे 8 एप्रिल रोजी Newbrew लाँच करण्यात आली. नवीन पाणी माल्ट, हॉप्स आणि यीस्ट स्ट्रेनच्या फ्लेवरला दूषित करत नाही. SIWW चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रायन युएन यांच्या मते, पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने न्यूब्रू ही सिंगापूरची 'ग्रीनेस्ट बिअर' काम करत आहे.

अशी बिअर आधीच बनवली गेली आहे

सिंगापूरच्या पाणीटंचाईबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, देशाच्या जलसंस्थेने हे पेय लॉन्च करून पाण्याच्या संकटाचा सामना करण्याचा मार्ग शोधला आहे. अशा प्रकारे बिअर बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी या क्राफ्ट बिअर कंपनी 'स्टोन ब्रूइंग' ने 2017 मध्ये 'स्टोन फुल सर्कल पेले अले' लॉन्च केले होते. 'क्रस्ट ग्रुप' आणि 'सुपर लोको ग्रुप' सारख्या इतर ब्रुअरीजने देखील स्वच्छ सांडपाणी पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करून क्राफ्ट बिअर बाजारात आणली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT