New York India Day Parade 2026 Dainik Gomantak
ग्लोबल

New York India Day Parade: न्यू यॉर्कमध्ये 44व्या 'भारत दिन परेड'चा दिमाख, 2 लाख प्रेक्षकांसमोर संगीत-नृत्याचा रंगतदार सोहळा; पूजा हेगडे अन् 'तारक मेहता'च्या कलाकारांची उपस्थिती

New York India Day Parade 2026: न्यू यॉर्कमधील प्रसिद्ध मॅडिसन एव्हेन्यू रविवारी (16 ऑगस्ट) भारतीय सांस्कृतिक वारशाच्या रंगीबेरंगी आणि उत्साहपूर्ण उत्सवाने उजळून निघाला.

Manish Jadhav

न्यूयॉर्कमध्ये यंदाची India Day Parade विशेष उत्साहात पार पडली. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या 80व्या वर्षाच्या निमित्ताने तसेच अमेरिकेच्या 250व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मॅनहॅटनमधील प्रसिद्ध मॅडिसन अव्हेन्यूवर भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधतेचे रंग पाहायला मिळाले. अमेरिकेतील भारतीय समुदायाने आपल्या सांस्कृतिक मुळांशी असलेले नाते या माध्यमातून पुन्हा अधोरेखित केले. मुख्य म्हणजे तब्बल 2 लाख प्रेक्षकांनी यंदाच्या सोहळ्याला लावली हजेरी लावली.

मॅडिसन अव्हेन्यूवर भव्य मिरवणूक

न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांच्या नेतृत्वाखाली मॅडिसन अव्हेन्यूवर ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्यासोबत न्यूयॉर्क राज्याचे सिनेटर जेरेमी कूनी, काँग्रेस सदस्य श्री थानेदार, असेंब्लीमन डेव्हिड वेप्रिन आणि रिपब्लिकन अटर्नी जनरल पदाच्या उमेदवार सरिता कोमिरेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.

यंदाच्या परेडमध्ये तब्बल 55 चित्ररथ सहभागी झाले होते. विविध भारतीय सांस्कृतिक संस्था, व्यावसायिक संघटना आणि प्रादेशिक संघटनांनी या चित्ररथांद्वारे भारताच्या वेगवेगळ्या भागांचे दर्शन घडवले. पारंपरिक नृत्य, संगीत, मार्चिंग बँड आणि विविध कलाकारांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

भारतीय वाणिज्य दूतावासाचाही सहभाग

न्यूयॉर्कमधील भारताच्या वाणिज्य दूतावासानेही स्वतंत्र चित्ररथासह या परेडमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे भारतीय समुदायाच्या सहभागाबरोबरच भारताचे अधिकृत प्रतिनिधित्वही या सांस्कृतिक सोहळ्यात दिसून आले.

भारतीय संस्कृतीतील विविधता आणि अमेरिकेतील भारतीय समुदायाची व्यापक उपस्थिती या परेडमधून ठळकपणे समोर आली. वेगवेगळ्या राज्यांतील संघटनांनी आपापल्या परंपरा, पोशाख आणि सांस्कृतिक वारसा सादर केला.

पूजा हेगडे आणि 'तारक मेहता'च्या कलाकारांनी वेधले लक्ष

यंदाच्या India Day Paradeचे आणखी एक आकर्षण म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती. अभिनेता-दिग्दर्शक अदिवी शेष हे देखील या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे परेडला मनोरंजन क्षेत्राचीही मोठी जोड मिळाली.

लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांचा सहभाग हा प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरला. मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यासोबत दिलीप जोशी, मंदार चांदवडकर, मुनमुन दत्ता, सोनालिका जोशी, बलविंदर सिंग सुरी आणि नितीश भालुनी हे कलाकार चित्ररथावर सहभागी झाले. कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी मॅडिसन अव्हेन्यूच्या मार्गावर मोठ्या संख्येने चाहते आणि प्रेक्षक जमले होते.

खाद्यपदार्थ, संगीत आणि नृत्याची मेजवानी

परेडपुरता हा सोहळा मर्यादित राहिला नाही. ईस्ट 26th स्ट्रीटवर मॅडिसन आणि पार्क अव्हेन्यूदरम्यान विशेष फूड फेस्टिव्हल आणि कम्युनिटी बूथ्स उभारण्यात आले होते. येथे विविध भारतीय खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक उपक्रमांचा अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळाली.

याशिवाय ईस्ट 26th आणि ईस्ट 25th स्ट्रीटदरम्यान सांस्कृतिक मंच उभारण्यात आला होता. दुपारभर पारंपरिक संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम सुरू होते. भारतातील विविध प्रांतांच्या कलापरंपरांना या मंचावर स्थान मिळाले.

भारतीय-अमेरिकन वारशाचा भव्य उत्सव

या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात FIAचे चेअरमन अंकुर वैद्य आणि FIAचे अध्यक्ष श्रीकांत अक्कापल्ली यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी मान्यवरांचे स्वागत करत संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात भूमिका बजावली.

2026 मधील India Day Paradeच्या भव्यतेतून न्यूयॉर्कमधील भारतीय समुदायाची वाढती सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख अधोरेखित झाली. प्रादेशिक संघटना, सांस्कृतिक संस्था, कलाकार, व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधी अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी या सोहळ्यात सहभाग घेतला.

मॅडिसन अव्हेन्यूवर फडकणारे भारतीय ध्वज, रंगीबेरंगी चित्ररथ, पारंपरिक वेशभूषेतील कलाकार आणि संगीताच्या तालावर थिरकणारे नृत्यसमूह यामुळे न्यूयॉर्कमध्ये जणू भारताचेच चित्र उभे राहिले. भारत आणि अमेरिकेतील दीर्घकालीन सांस्कृतिक संबंध तसेच अमेरिकेतील भारतीय समुदायाची विविधता यांचा हा अनोखा उत्सव ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT