Donald Trump Warning: 'इराणला मदत कराल तर याद राखा...' डोनाल्ड ट्रम्पनं पुन्हा जगाला धमकावलं; पुकारलं इकॉनॉमिक वॉर

America Iran Diplomatic Tension: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (19 ऑगस्ट) इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी एका मोठ्या आणि नव्या आक्रमक मोहिमेची घोषणा केली.
America Iran Diplomatic Tension
Donald Trump announces economic war against IranDainik Gomantak
Published on
Updated on

America Iran Diplomatic Tension: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (19 ऑगस्ट) इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी एका मोठ्या आणि नव्या आक्रमक मोहिमेची घोषणा केली. या मोहिमेत जो कोणताही देश इस्लामिक प्रजासत्ताक इराणला मदत करेल किंवा त्याच्याशी व्यापार करेल, त्याला अत्यंत "गंभीर आणि भयंकर" परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा कठोर शब्दात ट्रम्प यांनी धमकी दिली.

'ट्रुथ सोशल'वर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, "इराणला तडजोड आणि करार करण्याची जितकी संधी मी दिली, तितकी आजवर कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाने दिली नव्हती. दुर्दैवाने त्यांनी या संधीचा फायदा घेतला नाही. म्हणूनच, आज मी कोणत्याही देशाविरुद्ध आजवरची सर्वात मोठी आणि विनाशकारी आर्थिक कारवाई जाहीर करत आहे. हे एका अभूतपूर्व पातळीवरील आर्थिक युद्ध असेल ज्याद्वारे इराणला जगापासून पूर्णपणे वेगळे पाडले जाईल. इराण आता पूर्णपणे संपला आहे."

America Iran Diplomatic Tension
Donald Trump Warning: इराणला शस्त्रे दिल्यास चीन अन् रशियाची खैर नाही, डोनाल्ड ट्रम्पचा महाभयंकर इशारा; युरोपियन युनियनलाही घेतलं फैलावर

ट्रम्प यांनी जाहीर केले की, बँक, व्यवसाय, विमानतळ किंवा सरकारी संस्थांच्या माध्यमातून इराणला थेट अथवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या कोणत्याही देशालाही त्याचे भीषण आर्थिक परिणाम भोगावे लागतील. त्यांनी सहकारी देशांना तेल तस्करी, स्वॅप लाईन्स, कॅश ट्रान्सफर आणि बनावट कंपन्या यांसारखे सर्व मार्ग तातडीने रोखण्याचे आवाहन केले. ट्रम्प यांनी या मोहिमेला 'इकॉनॉमिक डी-डे' असे नाव दिले असून इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून कायमचे रोखणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

America Iran Diplomatic Tension
Donald Trump: 'मोजतबा खामेनेई 90 टक्के संपले!', डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; महिनाभराची युद्धबंदी एका रात्रीत हवेत विरली

दुसरीकडे, अमेरिकेतच ट्रम्प यांच्या या अत्यंत आक्रमक धोरणावर राजकीय टीका होत आहे. लष्करी किंवा मुत्सद्दी तोडगा निघत नसताना आणि अमेरिकन अध्यक्षीय निवडणुका जवळ आल्या असताना हा तणाव वाढवला जात आहे. दरम्यान, 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' या महत्त्वाच्या सागरी मार्गावरुन होणाऱ्या जागतिक व्यापार वाहतुकीवर इराणने रोख लावली असून अमेरिका आणि इराणमधील 60 दिवसांच्या शांतता चर्चेची मुदत संपल्याने दोन्ही देशांमधील तणाव आता पराकोटीला पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com