Jammu Kashmir Dainik Gomantak
ग्लोबल

जम्मू-काश्मीर अन् लद्दाख दाखवले पाकिस्तानचा भाग, नेपाळ एअरलाईन्सच्या नकाशाने खळबळ; अखेर भारतीयांच्या संतापापुढे झुकली कंपनी

Nepali Airlines Wrong Map Controversy: भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमधील प्रमुख एअरलाईन्स कंपनी सध्या आपल्या एका वादग्रस्त कृतीमुळे भारतीयांच्या निशाण्यावर आली.

Manish Jadhav

Nepali Airlines Wrong Map Controversy: भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमधील प्रमुख एअरलाईन्स कंपनी सध्या आपल्या एका वादग्रस्त कृतीमुळे भारतीयांच्या निशाण्यावर आली. नेपाळ एअरलाईन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन भारताचा एक चुकीचा नकाशा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये भारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मू-काश्मीर आणि लद्दाख हे पाकिस्तानचा हिस्सा असल्याचे दाखवले. ही गंभीर भौगोलिक चूक समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. भारतीयांनी कंपनीवर जोरदार टीका केली.

लाईव्ह हिंदुस्थानच्या अहवालानुसार, नेपाळ (Nepal) एअरलाईन्सने एका जाहिरात मोहिमेदरम्यान एक ग्राफिक पोस्ट केले होते. या ग्राफिकमध्ये एअरलाईन्सच्या मार्गांची माहिती देताना जो नकाशा वापरण्यात आला, त्यामध्ये भारतीय सीमांशी छेडछाड करण्यात आली होती. यामध्ये धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरला भारताऐवजी पाकिस्तानच्या भूभागात दाखवण्यात आले. जम्मू-काश्मीर हा भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा अतूट भाग असल्याने परदेशी संस्थेच्या या चुकीला थेट भारताच्या सार्वभौमत्वावर केलेला प्रहार मानले जात आहे.

ही पोस्ट व्हायरल होताच भारतीय युजर्संनी एअरलाईन्सला चांगलेच धारेवर धरले. ट्विटर (X) आणि फेसबुकवर लोकांनी एअरलाईन्सच्या या कृत्याचा तीव्र निषेध करत कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अनेक युजर्संनी तर नेपाळ एअरलाईन्सवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही केले. संतप्त नागरिकांनी भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयालाही टॅग केले, जेणेकरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर यावर कडक विरोध नोंदवला जावा.

चौफेर टीका होऊ लागल्यानंतर एअरलाईन्स प्रशासनाने ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची पद्धतही वादात सापडली. कंपनीने वादग्रस्त पोस्ट आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन गुपचूप हटवली खरी, परंतु या गंभीर चुकीबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा जाहीर माफीनामा सादर केलेला नाही. केवळ पोस्ट डिलीट करणे पुरेसे नाही, कंपनीने आपला हेतू स्पष्ट करावा, अशी मागणी युजर्स करत आहेत.

परदेशी संस्थांनी भारताचा (India) चुकीचा नकाशा दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी इस्रायली संरक्षण दल आणि ट्विटर सारख्या कंपन्यांनीही अशीच चूक केली होती, ज्यावर भारत सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतली होती. संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लद्दाख हा भारताचा अविभाज्य अंग आहे आणि सीमांचे चुकीचे चित्रण करणे हा दंडनीय अपराध आहे, हे भारताने वारंवार स्पष्ट केले. नेपाळ एअरलाईन्स मुख्यत्वे दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु सारख्या भारतीय शहरांसाठी उड्डाणे संचालित करते. अशा स्थितीत भारतीय बाजारपेठेवर अवलंबून असूनही केलेली ही राजकीय चूक कंपनीच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT