Nepal PM Oath Ceremony: नेपाळमध्ये 'बालेन' युगाचा उदय! रॅपर ते PM... बालेंद्र शाह यांनी घेतली 47 वे पंतप्रधान म्हणून शपथ

Balen Shah 47th Prime Minister Nepal: भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये आज (27 मार्च) एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला.
Balendra Shah to Take Oath as Nepal Prime Minister
Balen Shah 47th Prime Minister NepalDainik Gomantak
Published on
Updated on

Nepal PM oath : भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये आज (27 मार्च) एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अत्यंत लोकप्रिय तरुण नेते बालेंद्र शाह यांनी शुक्रवारी अधिकृतरित्या नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यासह ते नेपाळचे 47वे पंतप्रधान बनले. नुकत्याच 5 मार्च रोजी पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 275 पैकी 182 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवून पूर्ण बहुमत प्राप्त केले होते. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी संविधानाच्या कलम 76 (1) अंतर्गत शाह यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात दुपारी 12:34 वाजता हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला, ज्यामध्ये हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला.

बालेन शाह यांचा शपथविधी सोहळा धार्मिक आणि आध्यात्मिक विधींनी नटलेला होता. शुभ मुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यात सात शंखवादकांनी 'शंखनाद' केला, तर 108 वैदिक बटूंनी स्वस्तिवाचन करुन नवीन कार्यकाळासाठी शुभाशीर्वाद दिले. इतकेच नव्हे तर, 16 बौद्ध भिक्खूंनी 'अष्टमंगल' पाठाचे वाचन करुन या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त करुन दिली. पेशाने स्ट्रक्चरल इंजिनिअर असलेले आणि 'रॅपर' म्हणून तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेले बालेन शाह हे मधेस प्रांतातून येणारे नेपाळचे पहिले पंतप्रधान ठरले. त्यांच्या या प्रवासाने नेपाळच्या (Nepal) राजकारणातील जुन्या प्रस्थापित पिढीला मोठा धक्का दिला.

Balendra Shah to Take Oath as Nepal Prime Minister
Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

निवडणुकीच्या निकालांनी बालेन शाह यांच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब केले होते. पूर्व नेपाळमधील झापा-5 या मतदारसंघातून त्यांनी माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा प्रचंड फरकाने पराभव केला. शाह यांना 68,348 मते मिळाली, तर अनुभवी नेते असलेल्या ओली यांना केवळ 18,737 मतांवर समाधान मानावे लागले. 1991 नंतर नेपाळच्या संसदीय निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. या मोठ्या विजयानंतर गुरुवारी त्यांची पक्षाच्या संसदीय दलाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आणि आज त्यांनी पंतप्रधानपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.

Balendra Shah to Take Oath as Nepal Prime Minister
Nepal Violence: पशुपतिनाथाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भारतीयांच्या बसवर हिंसक जमावाचा हल्ला! मारहाण करुन लुटले सामान; अनेकजण जखमी

नेपाळमधील हा बदल प्रामुख्याने तरुणांच्या आकांक्षांचे प्रतीक मानला जात आहे. गेल्या वर्षी झालेल्या भ्रष्टाचारविरोधी 'जेन-जी' (Gen-Z) आंदोलनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती आणि बालेन शाह यांनी या असंतोषाला सकारात्मक बदलाची दिशा दिली. विजयानंतर त्यांनी प्रसिद्ध केलेले 'जय महाकाली' हे रॅप साँग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यातून त्यांनी एकतेचा संदेश दिला. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि सुशासन ही त्यांची मुख्य प्राथमिकता असणार आहे. लवकरच ते 15 ते 18 सदस्यांचे एक छोटे पण कार्यक्षम मंत्रिमंडळ (Cabinet) स्थापन करणार असल्याचे समजते. नेपाळमधील या 'बालेन युगा'मुळे दक्षिण आशियातील राजकारणात एक नवीन उत्साह संचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com