नेपाळ: नेपाळमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात जोरदार निदर्शने करत आहे. सोशल मिडियावरील बंदी आणि भ्रष्टाचार याच्याविरोधात तेथील तरुणाई आक्रमक झाली आहे.
सोमवारी देशात तरुणांनी रस्त्यावर उतरत जाळपोळ, दगफेक केली. संसदेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ही निदर्शने अधिक हिंसक झाली असून, जमावाने गृहमंत्री यांच्यासह पालिकेच्या इमारतीला आग लावली आहे.
हिंसक आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. जमावाने राष्ट्रपतींच्या बंगल्याची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली देश सोडून दुबईला जाण्याच्या तयारी असल्याचे सांगितले जात आहे.
तर, त्याच्या सरकारमधी अनेक मंत्र्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर आज हिंसक जमावाने त्यांच्या घराला आग लावली.
आंदोलकांनी पंतप्रधान ओली यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केल्यानंतर सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मालमत्तांची जाळपोळ, दगडफेक
हिंसक जमावाने किर्तीपूर महानगरपालिकेच्या इमारतीला देखील आग लावली. नया बाजार येथे असलेल्या या इमारतीला हिंसक जमावाने आग लावली आहे. तर, राजधानी काडमांडू येथे रस्त्यावर उतरलेल्या जमावाने वाहनांसह इतर मालमत्तांना आग लावून दगडफेक केली.
देशात राजकीय अराजकता निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीतून तत्काळ तोडगा काढण्याचा त्यांचा मानस होता. दरम्यान, ओली यांच्या सरकारमधील मंत्र्याचे राजीनामा सत्र सुरु झाल्याने ओली यांच्या समोरील समस्या वाढल्या आहेत.
सोशल मिडियावर बंदी घालण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. याशिवाय भ्रष्टाचारामुळे देखील सरकराला तरुणाईच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या या हिंसक आंदोलनाचे नेतृत्व ३६ वर्षीय सुदान गुरुंग हा करत आहे. हमी नेपाळ या युवा एनजीओचा तो अध्यक्ष आहे. ओली यांच्या सरकारमधील आत्तापर्यंत गृहमंत्री रमेश लेखक, पाणी पुरवठा मंत्री प्रदीप यादव, आरोग्य मंत्री प्रदीप पाऊडेल, कृषीमंत्री रामनाथ अधिकारी यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, नेपाळची राजधानी काठमांडूसह इतर शहरांमध्ये सरकारने कर्फू लागू केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.