Prachanda In India Dainik Gomantak
ग्लोबल

Prachanda In India: नेपाळचे माजी पंतप्रधान प्रचंड आज भारत दौऱ्यावर

भारतातील सत्ताधारी पक्ष भाजपच्या निमंत्रणावरून नेपाळचे माजी पंतप्रधान प्रचंड आज भारतात येत आहेत.

दैनिक गोमन्तक

नेपाळचे माजी पंतप्रधान आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे अध्यक्ष पुष्प कमल दहल 'प्रचंड' (pushpa kamal Dahal) आज दुपारी दिल्लीत येत आहेत. प्रचंड यांच्या सचिवालयानुसार ते भारतातील सत्ताधारी पक्ष भाजपच्या निमंत्रणावरून भारतात येत आहेत. 'बीजेपी को जानो' मोहिमेचा एक भाग म्हणून ते रविवारी म्हणजे 17 जुलैला भाजप मुख्यालयाला भेट देणार आहेत. जिथे ते भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेणार आहेत. यावेळी भाजपचे परराष्ट्र विभागाचे प्रभारी डॉ व्ही चौथवाले यांनी सांगितले की, या वेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजप मुख्यालयात जाण्यापूर्वी दहल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S.Jaishankar)आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्यासह इतर भारतीय नेत्यांशी चर्चा करतील. मात्र, अंतिम कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही, असे दहल यांच्या सचिवालयाचे म्हणणे आहे.

चीनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने काठमांडूला भेट दिल्यानंतर दहल यांचा दौरा होत आहे. चीनच्या शिष्टमंडळाने काठमांडूमध्ये नेपाळचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या आंतरराष्ट्रीय संपर्क विभागाचे प्रमुख लियू जियानचाओ यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चीनी शिष्टमंडळाने कम्युनिस्ट पक्षाच्या विविध नेत्यांची भेट घेतली आणि त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेपाळमध्ये डाव्या पक्षांची एकता निर्माण करण्याच्या चीन सरकारच्या प्रयत्नांमुळे सरकार आणि सत्ताधारी भाजपचा एक भाग चिंतेत आहे. नेपाळचे दोन वेळा पंतप्रधान राहिलेले, दहल हे एक प्रभावशाली कम्युनिस्ट नेते आहेत जे भारतातील राजकीय नेत्यांशी जवळचे आणि वैयक्तिक संबंध ठेवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

SCROLL FOR NEXT