Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: ''माझ्या पत्नीला माहित होतं ती मरणार आहे...''; गाझातील या व्यक्तीने इस्रायली हल्ल्यात गमावले 103 नातेवाईक

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात 4 मार्चपर्यंत युद्धविराम होईल, अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केली आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War:

इस्रायल आणि हमास यांच्यात 4 मार्चपर्यंत युद्धविराम होईल, अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केली आहे. युद्धविरामाच्या अटींनुसार, गाझामधील रुग्णालयांची दुरुस्ती केली जाईल, दररोज 500 ट्रक गाझामध्ये मानवतावादी मदत घेऊन पोहोचतील. युद्धविरामाच्या मसुद्यात इस्त्रायली आणि हमास दोघेही ओलिसांची सुटका करतील. त्याचबरोबर यामध्ये विस्थापित नागरिकांना परत आणण्याचीही तरतूद आहे. पण अहमद-अल-गुफेरीला आता घरी परत जाण्यात रस नाही, कारण युद्धाने अहमदकडून त्याच्या कुटुंबासह एकूण 103 नातेवाईकांना हिरावून घेतले. त्याच्यामध्ये आई, पत्नी, भाऊ, मुलगी, काका आणि काकू होत्या. इस्त्रायलच्या हल्ल्यात हे सगळे मरण पावले. अहमद सांगतो की, “गाझामध्ये माझ्या जवळचे सगळे संपले, मी आता का परत जाऊ? मला कोण बाप म्हणेल?"

दरम्यान, अहमद अल-गुफरी तेल अवीवमधील एका बांधकाम साइटवर काम करत होता, जेव्हा हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. युद्धामुळे, इस्रायलने अनेक ठिकाणी नाकेबंदी केली, परिणामी तो पत्नी आणि तीन मुलींकडे परत जाऊ शकला नाही. फोन करण्यास परवानगी असताना तो दररोज ठराविक वेळीच त्यांच्याशी बोलू शकत होता. 8 डिसेंबर रोजी जेव्हा त्याच्या घरावर हल्ला झाला तेव्हा तो पत्नी सिरीनशी फोनवर बोलत होता. हा त्यांच्यातील शेवटचा कॉल होता. हा हल्ला संध्याकाळी झाला आणि त्याची पत्नी आणि तीन लहान मुली - ताला, लाना आणि नजला - यांचा मृत्यू झाला. अहमद अल-गुफरी त्या दिवसाची आठवण करुन देताना सांगतो की, त्याच्या पत्नीला माहित होते की ती मरणार आहे.

आई, भाऊ, काकू यांच्यासह 103 जणांचा मृत्यू झाला

दरम्यान, या हल्ल्याने अहमदला त्याची पत्नी आणि मुलापासून कायमचे हिरावले. या हल्ल्यात त्याची आई, चार भाऊ आणि त्यांचे कुटुंबे तसेच त्याच्या काकू, काका आणि चुलत भाऊ यांचाही मृत्यू झाला. इतके महिने उलटूनही त्यांचे काही मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. गेल्या आठवड्यात त्याने आपल्या धाकट्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. तिचे नाव नजला आणि आज ती जिवंत असती तर दोन वर्षांची झाली असती. अहमद सांगतो की, “माझ्या मुली माझ्यासाठी परी आहेत. आमच्यासोबत काय झाले यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही."

दर 10 मिनिटांनी एका घरावर हल्ला होत होता

अहमदच्या हयात असलेल्या नातेवाईकांपैकी एक, हमीद अल-गुफरी यांनी बीबीसीला सांगितले की, जेव्हा हल्ले सुरु झाले तेव्हा जे लोक जीव वाचवण्यासाठी धावले ते वाचले पण ज्यांनी त्यांच्या घरात आश्रय घेतला ते मारले गेले. इस्रायली सैन्य दर 10 मिनिटांनी एका घरावर हल्ला करत होते. अहमदच्या आणखी एका नातेवाईकाचे म्हणणे आहे की, इस्त्रायली सैन्याने कोणतीही पूर्वसूचना न देता हल्ले सुरु केले. जर काही लोकांनी आधीच परिसर सोडला नसता तर शेकडो लोकांचा मृत्यू झाला असता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT