Relationships Dainik Gomantak
ग्लोबल

Relationships: धोका, धोका, धोका! आईनेच केली मुलीची फसवणूक, प्रियकरासोबत...

Mother Daughter: आई-मुलीचं नातं हे सर्वात खास मानलं जातं.

दैनिक गोमन्तक

Cheat In Relationship: आई-मुलीचं नातं हे सर्वात खास मानलं जातं. मात्र या मुलीची कहाणी ऐकल्यानंतर तुम्हाला तिच्या आईचा राग आल्याशिवाय राहणार नाही. या मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन आपली कहाणी सांगितली आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. मुलीने हा आपल्यासोबत झालेला सर्वात मोठा विश्वासघात असल्याचे म्हटले आहे.

आईने सत्य सांगितले

अमेरिकेत (America) राहणाऱ्या व्हेनेसाने सांगितले की, 'सुट्टीसाठी मी मेक्सिकोला गेले होते. त्यावेळी माझा प्रियकर आणि आई दोघेही घरीच होते.' व्हेनेसाने पुढे सांगितले की, 'जेव्हा मी मेक्सिकोहून आईला कॉल केला तेव्हा ती कॉलवरच रडू लागली.' काही दिवसांनी फोनवरच मुलीच्या (Girl) आईने धक्कादायक खुलासा केला.

आई प्रेग्नेंट राहीली

जेव्हा आईने तिच्या गरोदरपणाची बातमी मुलीला सांगितली, तेव्हा व्हेनेसाने बहीण होणार म्हणून आनंदाने उडी मारली. परंतु व्हेनेसाचा आनंद काही क्षणांसाठीचाच होता. यानंतर आईने सांगितले की, मी ज्या मुलाला जन्म देणार आहे, तो मुलगा तुझ्या प्रियकराचा आहे. हे ऐकून व्हेनेसाला मोठा धक्का बसला. व्हेनेसाला खूप राग आला. तिने लगेचच आई आणि प्रियकराला ब्लॉक केले. यानंतर व्हेनेसाने ट्रिप सोडून तात्काळ घरी परतण्याचा निर्णय घेतला. आता व्हेनेसा घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहू लागली आहे.

वेदनादायक कहाणी

या मुलीची वेदनादायक कहाणी सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल होत आहे. यूजर्स प्रियकर आणि मुलीच्या आईचा तिरस्कार करु लागले आहेत. एवढं करुनही प्रियकराने व्हेनेसाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण व्हेनेसाने तिच्या आई आणि प्रियकराला माफ केले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT