Baba Vanga Upcoming Predictions: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते. 2022 सालासाठी केलेल्या भाकितांपैकी आतापर्यंत 2 भाकिते खरी ठरली आहेत. यानंतर आता लोकांना बाबा वेंगा यांनी 2023 बद्दल केलेल्या भविष्यवाणीबद्दल जाणून घ्यायचे आहे. पाश्चिमात्य देशांतील मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांनी या वर्षासाठी एकूण 6 भाकिते केली होती. अशा परिस्थितीत आता लोकांना भीती वाटत आहे की, येत्या काही दिवसांत त्यांचे उर्वरित 4 अंदाजही खरे ठरु शकतात.
या चार भविष्यवाण्यांवर चर्चा करतायेत लोक
बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये कोरोना विषाणूनंतर नव्या प्राणघातक विषाणूची भविष्यवाणी केली होती. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय बाबा वेंगा यांनी एलियन आक्रमण, टोळांच्या आक्रमणामुळे दुष्काळासारखी परिस्थिती आणि आभासी वास्तवात वाढ होण्याचीही भविष्यवाणी केली होती. हे वर्ष पूर्ण होण्यास अद्याप जवळपास 71 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतावर संकट
बाबा वेंगाच्या भाकितांनुसार, 2022 मध्ये भारतात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बाबा वेंगा म्हणाल्या होत्या की, 2022 मध्ये जगातील देशांमध्ये तापमानात घट होईल. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होईल. विशेष म्हणजे, अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात पिकांची नासधूस होऊ शकते. अशा स्थितीत एकीकडे तांदळाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, टोळधाडीचा हल्ला झाल्यास पिके नष्ट होतील, त्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.
दुसरीकडे, बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये काही आशियाई देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) पूर येण्याची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली आहे. काही काळापूर्वी ऑस्ट्रेलियात पावसानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, तर पाकिस्तानमध्ये (Pakistan) पुरामुळे परिस्थिती बिकट झाली होती. यादरम्यान 1200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
तसेच, बाबा वेंगांसारखी मुलगी पुढे आली आहे, जी त्यांच्यासारखीच अचूक भविष्यवाणी करत आहे. हॅना कॅरोल या 19 वर्षांच्या मुलीने 2022 या वर्षासाठी 28 भाकिते केली होती, त्यापैकी 10 आतापर्यंत खरी ठरली आहेत. अमेरिकेच्या हॅना यांनी 2022 च्या सुरुवातीला महाराणी एलिझाबेथ II च्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली आहे. हॅनाच्या उर्वरित अंदाजांमध्ये किम कार्दशियनचे ब्रेकअप, रिहाना आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आई बनण्याचाही समावेश होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.