Aliens  Dainik Gomantak
ग्लोबल

Aliens-Human War: 2023 बाबत सर्वात भयानक भविष्यवाणी, दूसरी दुनिया से...!

Aliens-Human War: 'द चॅम्पियन' नावाचा एलियन यावर्षी पृथ्वीवर अवतरणार आहे. मार्च 2023 मध्ये तो 8,000 लोकांना पृथ्वीवरुन दुसऱ्या ग्रहावर घेऊन जाईल.

दैनिक गोमन्तक

Aliens-Human War: 'द चॅम्पियन' नावाचा एलियन यावर्षी पृथ्वीवर अवतरणार आहे. मार्च 2023 मध्ये तो 8,000 लोकांना पृथ्वीवरुन दुसऱ्या ग्रहावर घेऊन जाईल. हा धक्कादायक दावा एका ताज्या टिकटॉक व्हिडिओमध्ये स्वत:ला 'टाइम ट्रॅव्हलर' म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने केला आहे. 'टाइम ट्रॅव्हलर' असल्याचा दावा करणाऱ्या या टिकटॉक यूजर्सने सांगितले की, 'चॅम्पियन' नावाचा एलियन या वर्षी पृथ्वीवर येईल आणि पृथ्वीचा ताबा घेईल.

दरम्यान, टिकटॉकवर "रेडियंटटाइमट्रॅव्हलर" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एनो अलारिकने आणखी बरेच दावे केले आहेत. त्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे, एलियन्सने (Aliens) पृथ्वीवर कब्जा करणे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, एनो अलारिकने या वर्षी होणार्‍या मोठ्या घटनांकडे लक्ष वेधणारी इतर भविष्यवाणी देखील केली आहे.

आपल्या व्हिडिओमध्ये, कथित टाइम ट्रॅव्हलरने असेही म्हटले आहे की, जग लवकरच संपेल आणि दावा केला की, केवळ काही मोजकेच लोक वाचतील. TikToker Alaric ने 30 डिसेंबर रोजी त्याच्या 1,29,000 फॉलोअर्ससह व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की "चॅम्पियन" नावाचा एलियन पृथ्वीवर (Earth) आला आहे.

परकीय सैन्याविरुद्ध मानव जिंकू शकणार नाहीत, असेही तो म्हणाला आहे. या एलियन्सपैकी एक आपल्यापैकी काहींना वाचवेल. आणि 23 मार्च 2023 रोजी, सुमारे 8,000 लोकांना दुसर्‍या राहण्यायोग्य ग्रहावर घेऊन जाईल. याआधीही अशी अनेक भाकीते केली गेली आहेत. दुसरीकडे, आजपर्यंत एलियन्सबद्दल ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT