Watch Video: खोल दरीत केबलला लटकली बस, नेपाळमधील धोकादायक वाहतूक पाहून तुम्हाला धक्का बसेल

नेपाळमधील सार्वजनिक वाहतूकीची दुरावस्था दाखवणारा एक सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Nepal Viral Video
Nepal Viral VideoDainik Gomantak

नेपाळमध्ये 15 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात 72 नागरिकांचा दुर्दैवी मुत्यू झाला. यात पाच भारतीय नागरिकांचा देखील समावेश होता. नेपाळमधील पोखरा येथे ही घटना घडली होती. यावरून नेपाळमधील धोकादायक विमानतळाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

येती एअरलाईन्सच्या या विमान अपघाताची दखल जगात सर्वत्र घेण्यात आली. दरम्यान, नेपाळमधील सार्वजनिक वाहतूकीची दुरावस्था दाखवणारा एक सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल (Nepal Viral Video) होत आहे

Nepal Viral Video
Goa Flight Bomb Threat : फेक! रशियातून गोव्यात येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची ती अफवाच

काय आहे व्हिडिओ?

नेपाळमध्ये एक प्रवासी वाहतूक करणारी बस चक्क एका केबलला लटकवण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही बस एक खोल दरी पार करून पलिकडे पाठवली जात आहे. एक व्यक्ती या बसला धक्का देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. बस थोडी पुढे गेल्यानंतर तो पाठीमागे येतो व बस त्या केबलवरून पुढे सरकते.

आपण आजवर केबल कार पाहिली आहे. जी उंच डोंगरावर किंवा गड किल्यांवर जाण्यासाठी वापरली जाते. पण त्यात दोन ते चार लोकांची क्षमता असते. पण, पूर्ण बसच केबलवरून जात असल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

(Nepal Public Transport Video Goes Viral)

Nepal Viral Video
Watch Video:'काश्मीर पाकिस्तानचा राष्ट्रीय मुद्दा', तुरुंगातून जागतिक दहशतवादी मक्कीने ओकली गरळ

व्हिडिओची सत्यता काय?

अनेकांनी हा व्हिडिओ नेपाळमधील (Nepal Video) असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका व्यक्तीने हा व्हिडिओ खरा असला तरी संदर्भ चुकीचा असल्याचे म्हटले आहे. ही बस मोकळीच असून ती दिवसातून एकदा पलिकडच्या गावात वाहतूक सेवा देण्यासाठी पाढवली जाते. असा दावा केला. दरम्यान, हा दावा देखील किती खरा आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com