फेसबुकची मूळ कंपनी मेटा लवकरच लोकांना फेसबुक आणि इंस्टाग्रामवर नग्न शरीरासह स्वतःचे फोटो पोस्ट करण्याची परवानगी देणार आहे. फेसबुकने अशा चित्रांवर बंदी घातल्यानंतर जवळपास 10 वर्षांनी फेसबुकने आपले नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा निर्णय आमलात आणला जाऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.
एक दशकापूर्वी फेसबुकने नग्न फोटोंवर बंदी घातली होती, विशेषत: नग्न स्तन असलेल्या महिलांच्या फोटोवर बंदी घातली होती. या निर्बंधांना स्तनपान करणाऱ्या महिलांनी विरोध केला होता. फेसबुक त्याला पोर्नोग्राफरप्रमाणे वागवत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
याप्रकरणी काही महिलांनी 2008 मध्ये फेसबुकच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने केली होती. निदर्शने करणाऱ्यांमध्ये 'फ्री निपल मूव्हमेंट'च्या महिलांचाही समावेश होता.
अनेक महिलांनी 'फ्री द निपल' नावाची जागतिक चळवळ सुरू केली आहे. त्यांनाही पुरुषांप्रमाणे टॉपलेस फिरण्याचा अधिकार द्यावा, अशी या चळवळीतील महिलांची मागणी आहे. या महिलांच्या मागणीवरून अमेरिकेतील सहा राज्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये टॉपलेस फिरण्याची परवानगी दिली होती.
Facebook वर याच महिलांच्या मागणीचा सामना करत, निरीक्षण मंडळाने Meta ला महिला आणि ट्रान्सजेंडरच्या टॉपलेस फोटोंवर बंदी घालण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. निरीक्षण मंडळामध्ये शैक्षणिक, नेते आणि पत्रकार यांचा समावेश आहे.
दरम्यान, एका ट्रान्सजेंडर जोडप्याने 2021 आणि 2022 मध्ये एक पोस्ट केली होती. यामध्ये आरोग्याविषयी बाबींचा उल्लेख होता. फेसबुकने या पोस्ट हटविल्या होत्या. याप्रकरणी या जोडप्याने मेटाशी संपर्क साधला होता. तर, कंपनीकडून त्यांना समुदाय मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन्ही पोस्ट काढून टाकल्या. असे उत्तर दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.