PM Modi's UAE Visit Dainik Gomantak
ग्लोबल

PM Modi's UAE Visit: फ्रान्सनंतर UAE मध्येही मोदींचे जल्लोषात स्वागत, बुर्ज खलिफावर झळकला तिरंगा Watch video

Puja Bonkile

PM Modi's UAE Visit: आज एक दिवसीय दौऱ्यावर अबुधाबीला पोहोचले आहेत. त्यांच्या एकदिवसीय दौऱ्यात त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील वाढत्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी हे नेते भेट घेत आहेत.

या भेटीमुळे सोशल मिडियावर युजर्सचा या दौऱ्यासी संबंधित विविध पोस्ट शेअर करण्याची प्रेरणा मिळाली हे नक्की. त्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये जगातील सर्वात उंच इमारती बुर्ज खलिफाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मादींच्या दौऱ्याचे महत्व दाखवण्यासाठी जगातील सर्वात उंच इमारत भारतीय तिरंग्याने रंगली आहे.

वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी लिहिले की, 'पीएम मोदींच्या देशाच्या अधिकृत दौऱ्यापूर्वी दुबईच्या बुर्ज खलिफाने काल भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग प्रदर्शित केले'. 

व्हिडिओच्या सुरुवातीला गगनचुंबी इमारत भारतीय ध्वजाच्या रंगांनी उजळलेली दाखवली आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जाईल तसतसा त्यात पीएम मोदींचा फोटोही दिसत आहे. व्हिडिओचा शेवट 'माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत आहे' अशा संदेशाने दिसत आहे.

दरम्यान, फ्रान्सने पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार गौरवले आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर देऊन सन्मानित केले आहे.

हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान बनले. भूतकाळात, ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हे जगभरातील निवडक प्रमुख नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात आला आहे.

यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, किंग चार्ल्स - तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स, जर्मनीच्या माजी चांसलर अँजेला मर्केल, बुट्रोस बुट्रोस-घाली आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्यानंतर भारत-फ्रान्स यांचे राजनैतिक आणि द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT